मुलुंडमध्ये ओडिसा क्रिकेट लीग २०२१ संपन्न

मुलुंड(शेखरभोसले)भारतीय जनता पार्टी, मुलुंड विधानसभा यांच्या वतीने व जय जगन्नाथ फाऊंडेशन, स्पिरिट बॉईज यांच्या सहकार्याने ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक व आमदार मिहीर कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. २१फेब्रुवारी रोजी "ओडिसा क्रिकेट लीग २०२१" ओव्हरआर्म क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक क्रिकेट रसिकांनी उपस्थित राहून सामन्यांचा आस्वाद घेतला. काही लढती अधिक रोमांचकारक झाल्या. प्रभाग क्र. १०५ च्या नगरसेविका रजनी केणी, नगरसेवक निल सोमेय्या, भाजपा मुलुंड अध्यक्ष मनीष तिवारी, युवा वार्ड अध्यक्ष आनंद पाडी,  युवा वार्ड अध्यक्ष संतोष दास, नेहा चावला आदींनी उपस्थित राहून सहभागी टीम व उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. स्पर्धा यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी जय जगन्नाथ फाऊंडेशन, स्पिरिट बॉईजच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

संबंधित पोस्ट