शिवछत्रपती आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल अवार्डने साजन माडुरवार सन्मानित

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

गोंडपीपरी(प्रतिनिधी)महाविद्यालय एन.एस.एस कॅम्प च्या माध्यमातून समाजात जन-जागृती महाविद्यालयाचे नेतृत्व करून अनेकदा मिळवून दिलेले बक्षीस महाविद्यालयपील युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले अभूतपूर्व व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नुकतंच साजन माडुरवार याचा सन्मान करण्यात आला.

स्थानिक गोंडपिपरी येथील कला वाणिज्य  महाविद्यालयपील विध्यार्थी साजन हा विविध स्पर्धेत भाग घेऊन यश प्राप्त केले.त्याचीच दखल घेऊन संजिवनी शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित शिवछत्रपती गुणिजन गौरव महासम्मेलनात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शिवछत्रपती आदर्श युवक महाराष्ट्र राज्य युथ आयडॉल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले .मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी संजीवनी शिक्षण शेती संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेशवर सानप, सचिव गौरक्ष भवर,युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट