
आ. रमेश कोरगांवकर यांच्या विकासनिधीतून परिसरात विकास कामांचा शुभारंभ
- by Reporter
- Feb 21, 2021
- 455 views
मुलुंड:(शेखर भोसले) भांडूपचे शिवसेना आमदार, नगरसेवक, विभागप्रमुख रमेश कोरगांवकर यांच्या विकास निधीमधून जाधव चाळ, दत्तू माने चाळ, शिवकृपा जाधव चाळ, साफल्यनिवास, क्रांती नगर, नरदास नगर येथील शौचालयाच्या व आधार भिंतीच्या नुतनीकरणाच्या विकास कामांचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शनिवार दि २० फेब्रुवारी रोजी करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित आमदार, विभागप्रमुख, नगरसेवक रमेश कोरगावकर, शाखाप्रमुख राजेश कदम, म. शाखा संघटक भाग्यश्री गवस, इतर पदाधिकारी तसेच महिला व पुरुष शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
रिपोर्टर