मुलुंड तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शिवजयंती उत्सव साजरी

मुलुंड:(शेखर भोसले) मुलुंड तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शासकीय नियम पाळत मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती साजरी करण्यात आली. मुलुंड पूर्वेकडील चिंतामणी उद्याना जवळ झालेल्या या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पारंपरिक पद्धतीने पूजा करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना या वेळी राष्ट्रवादीच्या मुलुंड महिला तालुका अध्यक्ष व आयोजक संगीता वाजे आणि उपस्थितां कडून मानवंदना देण्यात आली. या वेळी नगरसेविका व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, ठाणे उपमहापौर पल्लवी कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विलास माने, मुंबई उपाध्यक्ष भास्कर विचारे, जिल्हा अध्यक्ष धनंजय पिसाळ, युवक जिल्हा अध्यक्ष भूषण शेलार, मुलुंड तालुका अध्यक्ष अमित सुरेश पाटील, सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचा यावेळी कार्यक्रम स्थळी आयोजक, राष्ट्रवादीच्या मुलुंड महिला तालुका अध्यक्ष संगीता वाजे यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला.

संबंधित पोस्ट