मुलुंड रेल्वे स्थानकात सुमारे १ लाख प्रवाशांची घट

मुलुंड:(शेखर भोसले)कोरोना संक्रमणा आधी मुंबईची लाईफलाईन रेल्वे लोकल दररोज लाखों प्रवाश्यांना तुडुंब गर्दी घेवून २४ तास धावत होती. कोरोना संक्रमणाच्या सुमारे ११ महिन्याच्या बंदीच्या कालावधीनंतर सामान्य प्रवाश्यांसाठी रेल्वे प्रशासनाने दि १ फेब्रुवारी पासून निर्धारीत वेळेत रेल्वेसेवा पूर्ववत सुरू केली. मात्र रेल्वेच्या निर्धारीत वेळेचा लाभ नेहमीच्या प्रवाश्यांना घेता येत नसल्याने रेल्वे प्रवासात मुलुंड मधून लाखों प्रवाश्यांची घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. 


या अनुषंगाने मुलुंड रेल्वे स्थानकाच्या तिकीट व्यवस्थापनाच्या मुख्य प्रबंधक स्वाती देशपांडे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड संक्रमणाच्या आधी मुलुंड रेल्वे स्थानकातून दररोज अंदाजे १ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे अपघात व चोरीच्या घटना नेहमीच घडत होत्या. परंतु कोविड संक्रमणाच्या ११ महिन्यानंतर १ फेब्रुवारी २०२१ पासून रेल्वे सेवा निर्धारीत वेळेत सुरू केल्यानंतर मुलुंड स्थानकात दररोज अंदाजे ४८ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे मुलुंड स्थानकातून प्रवास करणाऱ्या दररोजच्या प्रवाश्यांमध्ये सुमारे १ लाख प्रवाश्यांची घट झाल्याचे तसेच अपघात व चोरीच्या घटनेत देखील घट झाल्याचे प्रबंधक स्वाती देशपांडे यांनी सांगितले. 

संबंधित पोस्ट