चेंबूर एम पश्चिम विभागाची घरोघरी अँटीजन चाचणी! चाचणी करिता नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद !

मुंबई (जीवन तांबे)चेंबूर येथील एम पश्चिम विभागात कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने या ठिकाणच्या चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. 14 दिवसांसाठी या इमारती सील करण्यात आल्या आहेत. पालिकेने आता पर्यंत 750 इमारतींना नोटीस दिल्या आहेत. हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका एम पश्चिम आरोग्य विभागाने टिळकनगर प्रत्येक इमारतीत  घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची अँटीजन चाचणीला सुरुवात केली आहे. चेंबूर, टिळकनगर, कुर्ला, नेहरू नगर, चेंबूर रेल्वे स्थानक, चेंबूर कॅम्प, वाशीनाका, माहुल, झेंडा नगर, ठक्कर बाप्पा कॉलनी, परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण हळू हळू वाढताना दिसत आहे.

त्यामुळे या परिसरातील इमारतींना नोटीस देण्यात आल्या असून  कडक निर्बंध घालण्यात आले असल्याने परिसरात शुकशुकाट पसरला आहे.या परिवारात कोरोना वाढ होण्यास नागरिकाप्रमाणे पालिका ही जबाबदार असल्याची बातमी ता.18 फेब्रु रोजी सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच एम पश्चिम आरोग्य विभागाने प्रत्येक इमारतीत जाऊन अँटीजेन चाचणी सुरू केली आहे तसेच या चाचणी करिता इमारतीतील रहिवाशी स्वतःहून पुढाकार ही घेत आहेत. पालिकेने घरी जाऊन ही चाचणी करीत आहेत. इमारत, चाळ किव्हा झोपडपट्टी विभागात जाऊन जनजागृती करीत आहेत. आज टिळकनगर आरोग्य केंद्रातील डॉकटर व कर्मचारी यांनी इमारत क्रमांक 92 मधील एकूण 52 नागरिकांची अँटीजन चाचणी केली असता त्यात एक ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळेला नाही.

या पुढे प्रत्येक इमारतीत व संपूर्ण परिवारात अँटीजन चाचणी पालिका करणार आहे. पालिका आरोग्य विभाग व कर्मचारी यांना परिसरातील नागरिक स्वतःहून सहकार्य करण्यास येत आहेत. 

चेंबूर परिसरातील एम पश्चिम विभागात एकूण कोरोना रुग्ण संख्या ता. 8 जाने पर्यंत 1893 त्यात सध्या नव्याने 115 रुग्णाची भर पडल्याने रुग्ण संख्या एकूण 2008 वर गेली होती.त्यातील बरेच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आता पर्यंत ऍक्टिव्ह रुग्ण संख्या एकूण 288 वर गेल्याने चेंबूर व टिळकनगर परिसर हॉटस्पॉट वर गेला आहे.

टिळकनगर परिसरात इमारत एकूण 128 आहेत त्यात एकूण 60 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. या सर्व रहिवाशांची अँटीजण चाचणी करणे गरजेचे आहे. विना मास्क लोकांवर कारवाई केली पाहिजे.

चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात आजही दुकानदार विनामास्क दुकानात,  संध्याकाळच्या वेळेला चेंबूर रेल्वे स्थानक, चेंबूर कॅम्प, वाशी नाका, माहुल, कुर्ला रेल्वे स्थानक परिसर, नेहरू नगर जवळील रस्ते फेरीवाले व लोकांच्या वावराने गजबजलेले असतात दिसत आहे.

प्रतिक्रिया - अरुण शिंदे (  टिळकनगर आरोग्य केंद्र अधिकारी )

इमारतीत अँटीजन चाचणी सुरू केली आहे. ,इमारत असो किव्हा झोपडपट्टी घरोघरी जाऊन चाचणी करणार आहे.लोकांनी येऊन स्वतःहून चाचणी करावी व सहकार्य करावे.

प्रतिक्रिया -यतीन साळवी (समाज सेवक)  

पालिका आरोग्य विभाग अँटीजन चाचणी करीत आहे. इमारतीतील सर्व रहिवाशी व नागरिकांनी इमारती खाली येऊन चाचणी करून घ्यावी व पालिका आरोग्य विभागातील डॉकटर व आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करून चेंबूर व टिळकनगर परिसर कोरोना मुक्त करण्यास पुढाकार घ्यावा.

संबंधित पोस्ट