
वीज बिलाबाबत आरपीआय मुलुंडच्या वतीने महावितरणला निवेदन
- by Reporter
- Feb 20, 2021
- 883 views
मुलुंड:(शेखर भोसले)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), मुलुंड तालुका यांच्या वतीने बुधवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश भाऊ शिलवंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. ए सी सी रोड, मुलुंड विभाग या ठिकाणी महावितरणचे
कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांना एक निवेदन देण्यात आले. मुलुंड विभागातील गोरगरीब व झोपडीधारक यांना आपले थकीत लाईट बील टप्याटप्याने भरण्यासाठी सवलत मिळण्याबाबत व या काळात कोणत्याही ग्राहकांचा वीज विद्युत पुरवठा खंडित करू नये, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी आरपीआई (आठवले) चे मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश शिलवंत, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, मुंबई उपाध्यक्ष दादासाहेब झेंडे, ईशान्य मुंबई नेते अंबर केदारे, मुलुंड तालुका सचिव
शिवा शिंदे, दत्तू साळवे, बाळु भोसले, किरण अहिर तसेच वार्ड क्र. १०३ चे अध्यक्ष प्रकाशराव लहितकर उपस्थित होते.
वीज माफी बाबत सरकारने व सर्वच राजकीय पक्षांनी जनतेची घोर निराशा केली आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते कि, आपण आपलं लाईट बील २ टप्प्यात भरावे, अशी विनंती मुलुंड तालुका अध्यक्ष
योगेश शिलवंत यांनी यावेळी जनतेला केली आहे.
रिपोर्टर