
‘दर्पण’कार जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र म्हणून शासनाने केली सुप्रसिध्द चित्रकर्ती चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेल्या तैलचित्राची निवड
- by Reporter
- Feb 19, 2021
- 950 views
मुलुंड:(शेखर भोसले) महाराष्ट्र शासनाने बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले असून येत्या शनिवारी, दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या २०९ व्या जयंतीदिनी राज्य शासनाच्या मंत्रालय, विधिमंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा व तालुका येथील शासकीय कार्यालयांमधून जांभेकर यांना अभिवादन करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. त्याकरीता शासनातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र म्हणून महाराष्ट्र शासनाने सुप्रसिध्द चित्रकर्ती चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेल्या तैलचित्राची यासाठी निवड केली आहे. महाराष्ट्र शासनाने केलेल्या या तैलचित्राच्या निवडीबद्दल सुप्
सौ. चंद्रकला कुमार कदम या एक चित्रकर्ती असून त्यांनी भारतीय संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आलेले स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे तैलचित्र तसेच महाराष्ट्र विधान भवनातील महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, दादासाहेब मावळंकर, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, एस.एम.जोशी, गुजरात विधानसभेतील स्वा.वि.दा.सावरकर, मुंबई उच्च न्यायालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, मौलाना अब्दुल कलाम आझाद, लोकमान्य टिळक, सी. डी. देशमुख, जगन्नाथ शंकर शेठ, शंकर दयाळ शर्मा यांची तैलचित्रे तयार केलेली आहेत. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील “विष्णूदास भावे नाट्यमंदिर”, तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नांदेड-वाघाळा महानगरपालिका,पिंप्री-चिंचवड महानगरपालिका नाशिक महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका आदी संस्थांसाठी मान्यवरांची तैलचित्रेही चंद्रकला कुमार कदम यांनीच तयार करून दिलेली आहेत. तसेच त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहासाठीही भव्य तैलचित्रे नुकतीच तयार करून दिलेली आहेत.
रिपोर्टर