नगरसेवक उमेश माने यांचा विकास कामांचा धडाका

मुलुंड:(शेखर भोसले) भांडूप पश्चिम येथील शिवसेना नगरसेवक उमेश सुभाष माने यांच्या विकास निधीमधून प्रभाग क्रमांक ११५ मधील शिवकृपा चाळ, हनुमान सहकार सोसायटी, उत्कर्ष नगर येथे गुरुवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी लादीकरण, छोटे नाले, गटार, इत्यादींच्या पुनर्बांधणी आणि  सुशोभिकरणाच्या कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक आणि परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक उमेश माने हे विभागात करत असलेल्या विकासकामांबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून स्थानिक नागरिक देखील त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीबद्दल खुश असल्याचे बोलले जात आहे.


संबंधित पोस्ट