आ. मिहीर कोटेचा यांच्या आमदार निधीतून नानेपाड्यात सभागृह व कार्यालय.

मुलुंड (शेखर भोसले) मुलुंड पूर्व येथील नानेपाडा गावठाण परिसरात असलेल्या शिव गणेश मंदिराजवळ स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांच्या आमदार निधीतून भव्य सभागृह व नानेपाडा मित्र मंडळाचे कार्यालय नव्याने बांधण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि १८ फेब्रुवारी रोजी स्थानिकांच्या उपस्थितीत पार पडला. स्थानिक ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र एम. पाटील यांच्या हस्ते फीत कापून ह्या वास्तूंचे लोकार्पण नानेपाडा वासियांना व मुलुंडकरांना करण्यात आले. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, स्थानिक आमदार मिहीर कोटेचा, स्थानिक नगरसेवक प्रभाकर शिंदे, नगरसेविका रजनी केणी, नगरसेवक प्रकाश गंगाधरे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलुंड पूर्व येथील आमदार निधीतून बांधलेल्या नानेपाडा येथील या सभागृहाचा स्थानिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याने स्थानिकांनी आ. मिहीर कोटेचा यांचा ह्या कार्याबद्दल गौरव केला आहे तसेच नानेपाडा मित्र मंडळासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यालयाबद्दल नानेपाडा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी देखील आ. मिहीर कोटेचा यांचे आभार मानले आहेत.

संबंधित पोस्ट