
चेंबूर काँग्रेस कार्यालयात शिवजयंती साजरी
- by Reporter
- Feb 19, 2021
- 384 views
घाटकोपर दि 19 : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या शिवजयंती निमित्त आज चेंबूर काँग्रेस कार्यालयात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करत शिवजयंती साजरी करण्यात आली. दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे चेंबूर तालुका स्लम अध्यक्ष निलेश नानचे यांनी शिवजयंती दिनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागात मास्क , सॅनिटायझर वाटप केले. आज देशावर , राज्यावर कोरोनाच मोठं संकट घोंघावत आहे. शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे राज्यावर आलेलं संकट गनिमी काव्याने दूर सारल , त्या प्रमाणे आज छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी नीती आपण अवलंबली पाहिजे. आज कोरोनाशी लढताना शासनाला सर्वोत्तपरी सहकार्य करून प्रत्येकाने मास्क,सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवले पाहिजे कोरोना बाबतची आपली हीच लढाई असल्याचे सांगत निलेश नानचे यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.फेब्रु बातमीदार
रिपोर्टर