घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने रविवारी महाप्रसाद
- by Reporter
- Feb 19, 2021
- 577 views
घाटकोपर दि. 19 : घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने याही वर्षी लाडशाखीय वाणी समाज मंदिर हॉल , पार्कसाईड विक्रोळी येथे रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सांय 5 वा सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे , माजी मंत्री प्रकाश मेहता ,नगरसेविका राखी जाधव , प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे , व्हॉईस ऑफ घाटकोपरचे संपादक जतीन कोठारी , चित्रपट सेनेचे सचिव भूषण चव्हाण , माजी उपविभाग प्रमुख प्रकाश वाणी आदी उपस्थित राहणार असल्याचे कार्याध्यक्ष दीपक गवळी यांनी सांगितले.
रिपोर्टर