चेंबूर पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी उपहारगृह सुरू
- by Reporter
- Feb 19, 2021
- 615 views
घाटकोपर, दि. 19: 24 तास घडणाऱ्या घटनांवर बारीक्ष लक्ष ठेवून शहर सुरक्षित ठेवणाऱ्या पोलीस बांधवांसाठी विविध पोलीस ठाण्यात सोयी आणि सुविधा होताना दिसत आहेत.सण असो वा मोर्चे , त्सुनामी असो वा दंगल पोलिसाला दररोज दक्ष राहावे लागते. ऑन ड्यूटी 24 तास देताना स्वतःच्या कुटुंबापासून दोन दोन दिवसही बाहेर राहावे लागते. यातच शासनाचा पडणारा ताण व कर्तव्य निभावता निभावता शारीरिक व मानसिक ताण यातच पोलिसांची हयात जाते. चेंबूर हा दाटीवाटीचा आणि वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. सध्या या परिसरात कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढले आहे. लॉकडाऊन काळात अनेक पोलीस बांधवाना कोव्हीड मुळे आपला जीव गमवावा लागला. पोलिसांचे आरोग्य सदृढ राहावे याहेतूने चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्या प्रयत्नाने पोलीस बांधवांसाठी उपहारगृह आज ( दि 19 ) फेब्रु पासून सुरू करण्यात आले. शिवजयंती दिनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत नारळ वाढवून सदर उपहारगृह सुरू करण्यात आले. चेंबूर मोहल्ला कमिटी , राजकीय कार्यकर्ते , पोलीस अंमलदार यांच्या सहकार्याने हे उपहारगृह सुरू केले आहे. पोलिसांचे आरोग्य सदृढ राहिले तर पोलीस नागरिकांची सुरक्षा करू शकतील. उपहारगृहाची सुरक्षा व स्वच्छता यावर देखील आम्ही भर दिले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. यावेळी नगरसेविका आशा मराठे , महादेव शिवगण , चेंबूर तालुका स्लम अध्यक्ष निलेश नानचे , धाता मिश्रा आदी उपस्थित होते.
चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्या प्रयत्नाने आज पासून पोलीस बांधवांसाठी उपहारगृह सुरू करण्यात आले.
रिपोर्टर