
शिवजयंती निमित्त पवईत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ तिरंगा अभिवादन रॅली
- by Reporter
- Feb 19, 2021
- 928 views
घाटकोपर दि 19: महाराष्ट्राचे आराध्य दैवत , रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंती निमित्ताने शिवरायांचा शेती विषयक धोरणावर असलेला दृष्टिकोन लक्षात घेता सध्या दिल्लीच्या सीमेवर गेली कित्येक दिवसांपासून शेतकरी चुकीच्या शेती धोरणाविरोधात आंदोलन करीत आहेत आणि सरकार प्रणित काही संघटना, संस्था सेलिब्रिटी मंडळी त्यांचा अपमान करत असून कृषिप्रधान म्हणवणाऱ्या या देशासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. छत्रपती शिवरायांचा शेतीविषयी व शेतकाऱ्यांविषयी असलेला जिव्हाळा व विचार शेतकऱ्यांना तारणारा आहे. म्हणूनच शिवजयंतीचे औचित्य साधून आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ तिरंगा आज पवईतील हिरानंदानी परिसरात अभिवादन रॅली काढण्यात आली. युथ पॉवर संघटना, डीवायएफवाय , धडक कामगार युनियन यांच्या नेतृत्वाखाली ही रँली काढण्यात आली असून सरकारचे नियम पाळत अगदी काही जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी युथ पॉवर मुंबई प्रदेश अध्यक्ष विरेंद्र धिवार, धडक कामगार युनियनचे सचिव प्रकाश निकम, डीवायफायचे कॉम्रेड महेंद्र उघडे उपस्थित होते. कृषी कायदा रद्द करावा ही मागणी करत छत्रपती शिवाजी महाराज यांची शेतकऱ्यां बद्दलचा विचार या बद्दल ची माहीती यावेळी देण्यात आली.
रिपोर्टर