प्रभाग क्र १०३ येथे मनोज कोटक यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ
- by Reporter
- Feb 19, 2021
- 611 views
मुलुंड: (शेखर भोसले) ईशान्य मुंबईचे खासदार तथा मुलुंड मधील प्रभाग क्र १०३ चे नगरसेवक मनोज कोटक यांनी आपल्या नगरसेवक निधीतून लोकांच्या हितासाठीच्या विविध कामांचे उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार दि १९ फेब्रुवारी रोजी केले. स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
मुलुंड पश्चिम येथील सरदार प्रताप सिंह उद्यानातील शेडची दुरुस्ती तसेच या उद्यानाच्या कंपाऊंड वॉलचे काम, सरदार प्रतापसिंह उद्यान येथील वॉलीबोल कोर्टवर रब्बर मॅट बसविण्याचे कार्य, सी.टी.एस २९/३ ए उद्यान, रेडवुड सोसायटी येथील विविध विकास कामे, सी.टी.एस २६ उद्यान, रेडवुड सोसायटी परिसरातील विविध विकास कामे, बीट क्रमांक १०३ टी वॉर्ड येथील सरदार प्रतापसिंह उद्यान टीकवुड समोरील कंपाऊंड वॉलचे काम, सरदार प्रतापसिंह उद्यान बीट क्रमांक १०३ येथील प्रवेशद्वाराचे नूतनीकरण, सरदार प्रताप सिंह उद्यान बीट क्रमांक १०३ येथे ओपन एअर जिम बसवण्याचे काम, इत्यादी कामांचा शुभारंभ आज नगरसेवक मनोज कोटक यांच्या नगरसेवक निधीतून करण्यात आला. यासमयी स्थानिक नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रिपोर्टर