विक्रोळी येथे शिवराज्याभिषेक प्रतिकृतीचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

मुलुंड:(शेखर भोसलेमहाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद इतिहास कायम स्मरणात रहावा, महाराष्ट्र हित कायम डोळ्यांसमोर रहावे यासाठी महाराजांच्या राज्याभिषेकाची सुशोभनीय अशी प्रतिकृती विक्रोळी येथील नारायण बोधे चौकात साकारण्यात आली असून स्थानिक आमदार सुनिल राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिवराज्याभिषेक प्रतिकृतीचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवार दि १७ फेब्रुवारी रोजी पार पडले. यावेळी शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. 

यावेळी उदय सामंत यांनी आमदार सुनिल राऊत यांच्या कार्याचा गौरव करत, सुंदर अशी प्रतिकृती साकार केल्याबद्दल अभिनंदन केले तसेच अशीच प्रतिकृती माझ्या मतदार संघातही रत्नागिरी शहरात बनवणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी शिवरायांच्या प्रत्येक कृतीतून प्रेरणा मिळत असते त्यामुळे त्यांची राज्याभिषेक प्रतिकृती लोकार्पण सोहळ्यात मला आमदारांनी बोलावल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचे सांगत या आगळ्यावेगळ्या कल्पनेबद्दल अभिनंदन केले. तसेच राऊत यांच्या कार्याचा गौरव करताना सुनिल राऊत यांच्याकडे आक्रमकपणा, संयम आणि जनसेवेचा ध्यास यांचा उत्तम त्रिवेणी संगम असून तो गुण अनेकांनी शिकण्यासारखा आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

माजी आमदार शिशिर शिंदे यांनीही या वेगळ्या कल्पनेचे कौतुक करत, येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकासाठी ही प्रतिकृती प्रेरणा देईल असे सांगत त्यांनी आमदार सुनिल राऊत यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. आ. सुनिल राऊत यांनी त्यांच्या मतदारसंघाची भक्कम तटबंदी केलीये तशीच तटबंदी या प्रतिकृतीच्या बाजूलाही करावी अशी विनंतीही शिशिर शिंदे यांनी यावेळी केली. यावेळी उपस्थित भांडूपचे आमदार, विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांनी ही अप्रतिम वास्तु असून, आमच्या मतदार संघातही अशी वास्तु उभारण्यासाठी आम्हाला सहकार्य करा, तसेच तुमची कार्यपद्धती अफलातून असून आम्हालाही जनसेवेच्या या कार्यपद्धतीचे धडे द्या अशी कोटी केली. यावेळेस माजी महापौर दत्ता दळवी, म. विभागसंघटिका संध्या वढावकर, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

कार्यक्रमाला माजी खासदार संजय पाटील, नगरसेवक उपेंद्र सावंत, नगरसेविका सुवर्णा करंजे, राजराजेश्वरी रेडकर, नगरसेवक उमेश माने, उपविभागप्रमुख शेखर जाधव, विश्वास शिंदे, अनंत पाताडे, विधानसभा संघटक संदीप सावंत, दगडु म्हाम्हूणकर, परम यादव, उपविभाग संघटिका रश्मी पहुडकर, डॅा स्नेहल मांडे, विजय सोनमळे व इतर सर्व पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. विक्रोळी स्मशानभूमीत काम करणारे कोविड योद्धांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

संबंधित पोस्ट