जेष्ठ स्थानिक नागरिक मंचातर्फे ज्येष्ठांचा सामुदायिक वाढदिवस साजरा

मुलुंड: (शेखर भोसले)मुलुंड पूर्वमधील जेष्ठ स्थानिक नागरिक मंचातर्फे परिसरातील जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस सामुदायिक पणे  साजरा करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून तसेच भला मोठा केक कापून हा वाढदिवस गणेश घाटावर साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित एका छोटेखानी समारंभाला

मुलुंडमधील सर्व पक्षीय नेते, जेष्ठ नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलुंड भाजपचे महामंत्री नंदकुमार वैती, विलास सिंह रजपूत, कॉंग्रेसचे कैलास पाटिल, मनसेचे सत्यवान दळवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते, त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

मुलुंड मधील जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच मुलुंड मधील स्थानिक नागरी समस्या सोडवण्यासाठी, जेष्ठ स्थानिक नागरिक मंचची स्थापना काही वर्षांपूवी करण्यात आली होती. या मंचातर्फे सातत्याने जेष्ठांसाठी विविध उपक्रम राबवले जातात तसेच परिसरातील नागरी समस्यांना वाचा फोडली जाते. गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेली मुलुंड विभागात फिरणारी बेस्टची बससेवा, मंचाच्या प्रयत्नाने नुकतीच सुरु करण्यात आली आहे व या सेवेला मुलुंडकरदेखील भरघोस प्रतिसाद देत आहेत. तसेच खुप वर्षांपासून प्रलंबित असलेला गणेश घाटावरील उद्यानाचा प्रश्नही सोडविण्याचा मंचाचा निर्धार असून त्यासाठी सर्व कार्यकारिणी मंचाचे अध्यक्ष विजय साने साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील आहे. या सर्वांसाठी जास्तीत जास्त लोकसहभाग अपेक्षित असल्याने जास्तीत जास्त मुलुंडकरांनी मंचामध्ये सामील व्हावे असे आवाहन यावेळी अध्यक्ष विजय साने यांनी केले.

जेष्ठ नागरिक सेवा मंचाच्या सचिव सरिता मुळे, उपाध्यक्ष अनंत लाड, मिलिंद कुळकर्णी, राम चिंदरकर, किरण आठवले, अभिजित शिवलकर, योगेश मांजरेकर व इतर अनेक सदस्यांनी ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मेहनत घेतली. 

संबंधित पोस्ट