
वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या 4 तृतीय पंथीना अटक
- by Reporter
- Feb 17, 2021
- 592 views
घाटकोपर, दि १७ : विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत असणारे वाहतूक पोलीस शिपाई विनोद बाबुराव सोनवणे हे दि १६ फेब्रुवारी रोजी सांय ६ ते ६:३० च्या वेळेस छेडानगर सब वे येथे वाहतूक नियमनाचे कर्तव्य करीत असताना एका रिक्षातून ४ तृतीयपंथी प्रवास करताना दिसल्याने त्यांनी ई चलन कारवाई करण्यासाठी रिक्षाचा फोटो काढला असता नमूद रिक्षातून ४ तृतीयपंथी यांनी रिक्षातून उतरून फोटो काढल्याचा राग मनात धरत वाहतूक पोलीस शिपाई विनोद सोनवणे यांना हाताने व लाथेने जबर मारहाण करत त्यांचे युनिफॉर्मच्या शर्टचे बटन तोडून डोक्यावरील टोपी खाली पाडून वोकी टॉकीचे देखील नुकसान केले .या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी लवली करणं पाटील ( २७ ) , विकी रामदास कांबळे ( २६ ) , तनु राज ठाकूर ( २४ ) , जेबा जयंत शेख ( २४ ) यांना अटक केली असून त्यांच्यावर कलम ३५३, ३३२, २९४ , ४२७ , ५०४ , ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर