भीम आर्मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीदिन राज्यभर जातीमुक्तदिन म्हणून साजरा करणार.

मुंबई(प्रतिनिधी) माझ्या राज्यातला प्रत्येक व्यक्ती हा सुखी समाधानी असला पाहिजे , माझ्या माय बहिणींची अब्रू शाबूत राहिली पाहिजे , माझ्या राज्यातल्या अन्नदात्याच्या गवताच्या पात्यालासुद्धा धक्का लागू नये , माझा शेतकरी स्वाभिमानी जिणे जगला पाहीजे ,  हा उदात्त विचार घेऊन बहुजन प्रतिपालक , कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वकीयांचा बंदोबस्त करीत , परकीयांना मृत्यूसदनी धाडीत , ह्या मराठी मातीत स्वराज्य निर्माण केलं.त्याच बहुजन प्रतिपालकाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी महान जयंती १९ फेब्रुवारी २०२१ शुक्रवारी असून , भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्यप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महान जन्मदिन संपूर्ण राज्यात "जातीमुक्त दिन" म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्य प्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे , मुख्य महासचिव मा.सितारामबापू गंगावणे , कार्याध्यक्ष मा.मनिषभाऊ साठे आणि सुनीलभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली होणाऱ्या ह्या जातीमुक्तदिना निमित्ताने भीम आर्मीच्या सर्व कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक  कार्यक्रमांचे विविध कार्यक्रम आयोजित केल्याचेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.

कर्जत तालुकाप्रमुख शिवकन्या नम्रताताई ताम्हाणे यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून , भिवपुरी रोड येथील कार्यालयात सकाळी ११.०० वाजता जातीमुक्तदिन साजरा करून , कर्जत तालुक्यातील काही महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती देण्याचा पदनियुक्ती समारंभ आयोजित केल्याचे आणि ह्या समारंभाला भीम आर्मीचे कार्यकर्ते-पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याचेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले आहे.

संबंधित पोस्ट