
चेंबूर मध्ये कोरोना रुग्णांची वाढ चेंबूर व टिळकनगर ठरतोय हॉटस्पॉट!
उच्च भ्रू लोकवस्ती असल्याने पालिकेचे दुर्लक्ष!
- by Reporter
- Feb 17, 2021
- 771 views
मुंबई (जीवन तांबे)मुंबई उपनगरामधील चेंबूर व टिळकनगर परिसरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बिना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना वेसण कशी घालायची हा पालिका एम पश्चिम विभागा समोर मोठा पेच उभा राहिला आहे.
मुंबई परिसरात कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारने लॉकडाउन उठवून लॉकडाउन निर्बंध शिथिल केले त्यामुळे महाराष्ट्र भर नागरिक बिनधास्त वावरु लागल्याने परिणामी उपनगरातील महत्वाचे असलेल्या चेंबूर, टिळकनगर परिसरात गेल्या काही दिवसां मध्ये कोरोना रुग्ण हळू हळू वाढताना दिसत आहे.
चेंबूर परिसरातील एम पश्चिम विभागात एकूण कोरोना रुग्ण संख्या ता. 8 जाने पर्यंत 1893 त्यात सध्या नव्याने 115 रुग्णाची भर पडल्याने रुग्ण संख्या 2008 वर गेली आहे.
त्यातील आतापर्यंत 1550 रुग्णांना घरी सोडले आहेत तर त्यात एकूण 55 रुग्ण मृत्यू पावले आहे साध्य 3 कोरोना रुग्ण मृत्यू पावले आहेत.
ऍक्टिव्ह रुग्ण संख्या एकूण 288 वर गेली आहे.
गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर पाहिजे त्या पद्धतीने नागरिकांनी तसेच एम पश्चिम विभागाने योग्य ती काळजी न घेतल्याने ही रुग्णाची संख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे.
टिळकनगर परिसरात इमारत एकूण 128 आहेत त्यात एकूण 60 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या आहे.
एकूण 128 इमारती पैकी 100 इमारतीत दुकानदार करिता एकच सार्वजनिक शौचालय आहे.
त्यामुळे शौचालयाचा सर्वजण वापर करीत असल्याने तसेच या इमारतीत सुरक्षा रक्षक आहे ते खाजगी ठेकेदार मार्फत ठेवलेले आहे त्यांना प्रत्येक इमारतीत सुरक्षा करिता ठेवले जात आहे.
बाहेरून येणारे रिक्षाचालक, भाजीविक्रेते, मासे विक्रेते अधिक आहेत. टिळकनगर क्रीडांगण मैदान या ठिकाणी सुलभ शौचालयाची अस्वच्छता, एकत्रित वापर, बाहेरून येणाऱ्या प्रेमी युगल व खेळायला येणाऱ्या तरुणांच्या तोंडाला मास्क नसणे तसेच पालिकेने बंद केलेली जनजागृती, बंद केलेली कोरोना चाचणी, बंद केलेले चाचणी केंद्र, चाचणी केंद्र पेस्टम सागर कडे हलविणे, लोकांची जाण्यास टाळाटाळ, उच्च भ्रू वस्ती समजून दुर्लक्ष करणे, चेंबूर परिसरातील रेल्वे स्थानक व चेंबूर कॅम्प मध्ये खरेदी करता ग्राहकांची संध्याकाळी होणारी तुफान गर्दी, विक्रेते तोंडाला मास्क न लावता उभे राहणे त्याच्यावर पाहिजे तशी कारवाई न केल्यानेच चेंबूर आणि टिळकनगर परिसरात कोरोनाने जोर पकडला आहे.
डॉ. भूपेंद्र पाटील ( वैद्यकीय अधिकारी एम पश्चिम )
चेंबूर परिसरात एकूण 190 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यातील 150 रुग्ण टिळक नगर परिसरातील आहे.
नागरिकांचा निष्काळजी पणा, कोणतीही खबरदारी न घेणे, मैदानात बिनधास्त खेळणे, लग्न कार्यात 50 पेक्षा अधिक लोक येणे तोंडाला मास्क न लावणे या मुळे कोरोना रुग्ण वाढत आहे.
आता योग्य ती कारवाई करणार आहोत. हा परिसर कोरोना मुक्त कसा होईल या करिता घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करणार आहोत.
यतीन साळवे ( समाज सेवक )
लोकां बरोबर या परिसरात रुग्ण वाढीस पालिका ही जबाबदार आहे. पालीका सोसायटीला नोटीस देऊन आपली जब्बाबदरी छडकून टाकत आहे. पालिकेने दुकानदार, फेरीवाले, रिक्षा, सुरक्षा रक्षक यांची करायचे बंद केले होते. रुग्ण वाढत असल्याने सध्या दोन दिवसापासून चाचणी सुरू केली आहे.
ता. 31 जानेवारी रोजी कोरोना कंट्रोल आल्याने चाचणी बंद केली होती. आता आम्ही दबाव टाकल्यावर घरोघरी चाचणी सुरू केली आहे.काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी जनजागृती बंद केल्याने रुग्ण वाढले आहेत.
मास्क कारवाई पालिका न करता ठेकेदाराला दिले आहे ते फक्त कमविण्याचा धदा करीत आहे. पालिके बरोबर व लोक जबाबदार आहेत.
रिपोर्टर