सुकन्या समृद्धी ठेव योजने मध्ये 250 विद्यार्थीनीचे उघडले खाते

घाटकोपर, दि.१७ : एस्. पी. आर.जे. कन्याशाळा संस्थेतर्फे विद्यार्थिनींना मदत करण्याचा अनोखा प्रयत्न घाटकोपर पश्चिम येथील एस्. पी. आर. जे. कन्याशाळा या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या गुजराती मिडीयम शाळेमध्ये शिकणाऱ्या २५० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना आधार कार्ड काढून देण्यासाठी संस्थेने एस्. टी. मेहता शाळेच्या आवारात आठवडाभर कॅम्प आयोजित केला होता.विद्यार्थिनींना आयुष्यामध्ये काटकसरीचे महत्त्व समजावे व बचत करण्याची सवय व्हावी या दृष्टीने सरकारच्या सुकन्या समृद्धी ठेव योजनेमध्ये २५०पेक्षा जास्त विद्यार्थिनींचे खाते उघडून देण्यात  एस्. पी. आर. जे. कन्या शाळेच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती मीनाबेन  खेतानी यांच्या मार्गदर्शनाखाली  गुजराती मीडियम शाळेच्या प्राचार्या सौ. सुजाता रामेकर व सौ नंदा बेन ठक्कर यांनी विद्यार्थीनींचे  आधार कार्ड काढणे आणि सुकन्या समृद्धी योजना मध्ये विद्यार्थीनींचे खाते उघडणे हे सरकारचे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विशेष प्रयत्न केले.

संबंधित पोस्ट