राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या राज्य सचिव पदी नियुक्ती

घाटकोपर, दि १७ :ज्येष्ठ पत्रकार दिपक आढाव यांची राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्ष जिग्नेशभाई मेवानी , महाराष्ट्र अध्यक्ष रमेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक आढाव यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले आहे. राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या माध्यमातून दलितावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवला जातो. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या या संस्थेची कार्यकारिणी प्रत्येक राज्यात करण्यात आली आहे. मंचच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत आहे. दिपक आढाव हे चेंबूर परिसरात राहत असून सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात पत्रकारिता क्षेत्रातील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन संस्थेने त्यांची राज्य सचिव पदी नियुक्ती केल्याचे राज्याचे अध्यक्ष रमेश भोईर यांनी सांगितले."

संबंधित पोस्ट