म्हाडा असोसिएशनतर्फे वर्षभरातील चवथ्या रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन
- by Reporter
- Feb 17, 2021
- 470 views
मुलुंड:(शेखर भोसले) मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनीत रविवार दि १४ फेब्रुवारी रोजी "वेलेनटाईन डे" चे निमित्त साधत म्हाडा असोसिएशन, जियो लाईफ फाऊंडेशन, नवरात्र मंडळ, रोटरी क्लब मुलुंड यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. म्हाडा कॉलनी
असोसिएशनचे अध्यक्ष रवी नाईक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुमारे ३९ रक्तदात्यांनी या शिबिरात प्रत्यक्ष सहभाग घेवून रक्तदान केले. सुमारे ८ रक्तदात्यांना हिमोग्लोबिन कमी असल्याने रक्तदान करता आले नाही. गेल्या वर्षभरातील कोविड काळात एकूण ४ रक्तदान शिबिरांचे आयोजन म्हाडा कॉलनी असोसिएशनतर्फे करण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष रवी नाईक यांनी यावेळी दिली.

रिपोर्टर