तर मुंबईतही पुन्हा लॉकडाऊची शक्यता महापौरांचा इशारा

मुंबई, दि.१६ (अल्पेश म्हात्रे) कोरोनाच्या आकडेवारीत घट होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबईतील जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांकरता १ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आली . तर लोकल सुरु होऊन आता १५ दिवस झाले आहेत. मात्र, आता चिंतेची बाब समोर आली आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  यांनी दिला आहे.

कोरोनाच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देणे फार गरजेचे आहे. लोकांनी नियमांचे पालन करावे. तसेच लोकलमधून  प्रवास करताना प्रवासी तोंडाला मास्क न लावणे, गर्दी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे. यामुळे कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल. त्यामुळे लॉकडाऊन लागू करणे हे केवळ नागरिकांच्या हातात आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांना हेच सांगणे आहे की, आपल्याला लॉकडाऊन नको आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारला नाईलाजास्तव लॉकडाऊन करावे लागेल अशी भीती राज्य  सरकारने व्यक्त केली आहे.

डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने घट झाली होती. यामुळे सहा महिन्या भरापूर्वी देशात कोरोनाचा हॉटस्पॉट झालेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होत असल्याचे चित्र होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार बरोबरच पालिकेनेही काही अटी शर्थींवर निर्बंद्ध शिथिल केले. त्यानंतर फेब्रुवारीपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा ठराविक वेळांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. पण नंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे समोर येत आहे.

संबंधित पोस्ट