सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी ‘महाफार्म’ ब्रॅंन्डचा पंजाबमध्ये शुभारंभ - सहकारमंत्री सुभाष देशमुख
- by Adarsh Maharashtra
- Nov 15, 2018
- 1708 views
मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या ( एमसीडीसी) माध्यमातून राज्यातील सहकारी संस्थाच्या सक्षमीकरण करण्यात येत आहे. सहकारी संस्थांनी तयार केलेल्या उत्पादनाचे ब्रँन्डिग, पॅकेजींग,आणि मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्राने ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड तयार केला आहे.या‘महाफार्म’ ब्रॅंडचा शुभारंभ पंजाबमध्ये करण्यात आला. अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
चंदीगड येथील विक्री केंद्रांवर आणि लुधियाना येथे आयोजित पंजाब मार्कफेड प्रदर्शनात ‘महाफार्म’चा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी पंजाबचे सहकार व कारागृह मंत्री सुखजिंदर सिंग, खासदार संजय पाटील, पंजाब मार्कफेडचे व्यवस्थापकीय संचालक वरूण रूजम, चेअरमन अमरजित सम्रा, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पोकळी, फळ तंत्रज्ञान प्रमुख चंद्रकांत माळी, सहकार मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राजाराम दिघे, सागर पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यातील सहकारी पणन व्यवस्था बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासन अटल महापणन विकास अभियान राबवत आहे. दिनांक २५ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्र पणन महासंघाचे (महामार्कफेड) आणि पंजाब मार्केटिंग फेडरेशन (मार्कफेड), विदर्भ पणन महासंघ आणि पंजाब मार्कफेड तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि पंजाब मार्कफेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले होते. त्याचा पुढचा टप्पा म्हणून ‘महाफार्म’ ब्रॅंन्डचा शुभारंभ पंजाबमध्ये करण्यात आला.
यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये असलेली सेंद्रीय गूळ, हळद पावडर, काजू, काळा मसाला या उत्पादनाचा समावेश आहे.
पंजाब आणि महाराष्ट्र राज्यातील कृषीमाल तसेच कृषी प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीची व्यवस्था निर्माण केल्यास दोन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळू शकेल. पंजाब राज्य कृषीच्या बाबतीत देशामध्ये अग्रगण्य आहे. तसेच तेथील शासनाच्या पणन महासंघामार्फत कृषीमालावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. पंजाबने केलेल्या ब्रँडिंगच्या पद्धतीचा उपयोग महाराष्ट्रातील कृषिप्रक्रिया व ब्रँडिंग करण्यासाठी होईल. त्यासाठी पंजाबने सहकार्य करावे असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम