छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन राज्यभर जातीमुक्त दिन म्हणून हर्षोल्लासात पाळावा.

भीम आर्मीचे राज्यप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांचे आवाहन.

मुंबई(प्रतिनिधी) बहुजन प्रतिपालक , कुळवाडी भूषण स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात कोणत्याही प्रकारच्या जातीभेदाला , पाखंडी धर्मांधवादाला , विकृत अंधश्रद्धेला काडीचाही थारा न देता तथागत बुद्धांनी प्रतिपादित केलेला "मानव" हा केंद्रस्थानी मानून रयतेचे-जनतेचे-लोकांचे लोकराज्य निर्माण केले , अश्या ह्या महान लोकराजाचा १९ फेब्रुवारी हा महान जन्मदिन संबंध महाराष्ट्रात जातीमुक्तदिन म्हणून पाळावा, असे जाहीर आवाहन भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांनी राज्यातील जनतेला केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

आज शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात जी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे ती नक्कीच अस्वस्थ करणारी असून , आज चारी बाजूने आमचा अन्नदाता होरपळल्या जात असून , आमच्या ह्या बळीराजाला उचित न्याय मिळाला पाहिजे , तो जगला पाहिजे हीच भीम आर्मीची स्पष्ट भूमिका असून , छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या ह्या बळीराजाला त्याचे न्यायहक्क मिळाले पाहिजे , अशी भावना सुद्धा राज्यप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे ह्यांनी बोलून दाखविल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले आहे.

राज्यप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांच्यासह मुख्य महासचिव मा.सिताराम गंगावणे , कार्याध्यक्ष मा.मनिषभाऊ साठे आणि सुनीलभाऊ गायकवाड यांनी सुद्धा महाराष्ट्रातील सर्व जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांची जयंती सर्व प्रकारचे शासकीय नियम पाळून वैचारिक कृतिशील पद्धतीने साजरी करण्याचे विनम्र आवाहन केल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

संबंधित पोस्ट