
कोरोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा रेल्वे प्रवासाबद्दल विचार ?पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी
- by Reporter
- Feb 15, 2021
- 1145 views
मुंबई(अल्पेश म्हात्रे) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकलसंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी . आपण १५ दिवसांचा कालावधी देखरेखीसाठी ठेवलेला असून , तो २१ ते २२ तारखेला संपुष्टात येणार आहे. त्यादरम्यान आम्ही पुन्हा रुग्ण संख्येचा आढावा घेऊ आणि त्यानंतर सर्वसामान्यांच्या प्रवासाचा निर्णय होईल, असंही सुरेश काकाणींनी स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले .
लोकल सुरू केल्यामुळे रुग्ण संख्या वाढली, असं एकमेव कारण आहे, असं म्हणता येणार नाही.हवाई वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मोजक्या शहरातून किंवा मोजक्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होती, पण त्यांची संख्या वाढलेली आहे. प्रवाशांची आपण RTPCR चाचणी करतोय. डोमेस्टिक मध्ये सुरुवातील ४ राज्यांतील चाचण्या करत होतो, आता ५ राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांच्या आपण चाचण्या करतोय. लोकल प्रवाशांची संख्या वाढतेय, त्याचसोबत सगळ्यांनी मास्क लावणं, सामाजिक अंतर राखणं गरजेचे आहे, असंही काकाणी म्हणालेत. काळजी घेतली नाही तर त्रास होईल , त्रिसूत्रीच पालन करावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात चर्चा नाही. आपण आखून दिलेल्या कार्यक्रमाचं पालन केले, तर आजारापासून आपण सुरक्षित राहू शकतो.
मुंबई महापालिका आणि आजूबाजूच्या महापालिका विचारात घ्याव्या लागतील आणि नंतर त्यासंदर्भातील शिफारस, मुद्दे राज्य शासनाला उपलब्ध करून देऊ , त्यानंतर निर्णय घेता येईल, असंही सुरेश काकाणींनी सांगितलंय. लसीकरणाच्या पहिल्या टप्याला १६ जानेवारीत सुरुवात झाली होती. एका महिन्यात दुसऱ्या टप्याला सुरुवात करू शकलो. सुरुवातील कोविड अॅपमध्ये थोड्या अडचणी होत्या, पण बाकी लोकांना आपण डोस देतोय. २३ केंद्रात लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे लसीकरणाच्या मोहिमेत तिसऱ्या टप्यात खासगी रुग्णालयांची गरज भासणार आहे, त्याची पूर्वतयारी म्हणून त्या त्या खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लसीकरणाची परवानगी आम्ही दिलेली आहे. २० खासगी रुग्णालयात सहभागी आहेत. त्यांची आम्ही तपासणी पूर्ण केलेली आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांना आज आणि उद्या आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. ज्यांना प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना लस देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. परवापासून त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरणास प्रारंभ होऊ शकेल, अशी व्यवस्था केलेली आहे. मुंबईतील जी मोठी रुग्णालये आहेत, ज्यात त्यांच्याकडे वेटिंग रूम, लसीकरण रूम, ऑब्जर्वेशन रूम, पुरेसं मनुष्यबळ असेल, लस साठवणुकीसाठी व्यवस्था असेल, अशा रुग्णालयांना आपण परवानगी देण्याची व्यवस्था आपण केलीय, अशी माहिती काकाणी यांनी दिलीय.
रिपोर्टर