
छोट्याशा जागेत उत्सव साजरा करणारे चिंतामणी मित्र मंडळ
- by Reporter
- Feb 15, 2021
- 556 views
घाटकोपर,दि.१५ :लहानांपासून मोठ्यांपर्यंत श्रीगणेश उत्सव म्हणजे सर्वांसाठी आस्थेचा , श्रद्धेचा आनंदोत्सवच. भाद्रपद महिन्यात साजरा होणारा श्रीगणेश उत्सव माघ महिन्यातही मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे. श्रीगणेश उत्सव म्हंटल की भरीव जागा भव्य मंडप , लाईटिंग अस चित्र समोर दिसत मात्र घाटकोपर पश्चिम साईनाथ नगर रोड येथील चिंतामणी मित्र मंडळ गेली ९ वर्षांपासून छोट्याशा गल्लीत साधारण तीन माणसं उभी राहतील अशा छोट्याशा जागेत उत्सव साजरा करत आहेत. मंडळाची जागा छोटीशी असली तर आतील सजावट मात्र देखणी आहे. यंदा मंडळाचे ९ वे वर्ष असून यावेळी कोरोनाकाळात संघर्ष करणाऱ्या पोलीस बांधव , सफाई कर्मचारी , डॉक्टर , नर्स , पत्रकार यांना संघर्ष योद्धा हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दिनेश रेवाळे यांनी सांगितले. श्री गणेश उत्सवासाठी सभासदांकडून जमा केलेल्या वर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून आदिवासी पाड्यात वस्तू वाटप , गरजूंना शैक्षणिक वस्तूचे वाटप होत असल्याचे मंडळाचे सचिव संदेश मुंडेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
रिपोर्टर