महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मुंबईच्या रसिका अवेरे हिने पटकावले सुवर्णपदक

घाटकोपर दि.12 : औरंगाबाद मध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्य पद निवड चाचणी स्पर्धा 2021 मध्ये उत्तम कामगिरी करत मुंबईतील रसिका चंद्रकांत अवेरे हिने महिला चॅम्पियन सिप खेळात 47 किलो वजनी गटात ज्युनिअर आणि सिनिअर दोन्ही मध्ये बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. 6 फेब्रुवारी 2021 ते 7 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्य पद क्षेत्रात निवड चाचणी स्पर्धेत ज्युनिअर आणि सिनियर महिला व पुरुष चॅम्पियन सिप स्पर्धा खेळवण्यात आल्या. या खेळात सरस कामगिरी करत रसिका हिने सुवर्णपदक पटकावत मुंबईसह गुहागर तालुक्याचे देखील नाव रोशन केल्याचे उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपाचे क्रीडा सांस्कृतिक अध्यक्ष जयेश वेल्हाळ यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले. रसिका अवेरे ही दरवर्षी होणाऱ्या राज्य पातळीवर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेते. मुंबईच्या गोरेगाव मध्ये राहणाऱ्या रसिका अवेरे सामान्य कुटुंबातील मुलगी असून शाळेत असतानाही ती विविध खेळात भाग घेऊन बक्षीस मिळवत असे. राज्य स्तरावर होणाऱ्या महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याच तीच स्वप्न तिने प्रत्यक्ष साकार केल्याची प्रतिक्रिया तिचे वडील चंद्रकांत अवेरे यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात शारीरिक खेळामध्ये मुलीचं प्रमाण खूप कमी आहे. रसिकाच्या कामगिरीकडे पाहून ग्रामीण भागातल्या मुली आदर्श घेतील असे जयेश वेल्हाळ यांनी रसिका अवेरे हिला शुभेच्छा देत व्यक्त केले. 



संबंधित पोस्ट