दुष्काळग्रस्तांसाठी मनसेचा 'दंडुका मोर्चा'
- by Adarsh Maharashtra
- Nov 14, 2018
- 832 views
मुंबई: दुष्काळग्रस्तांसाठी मनसे आक्रमक झाली आहे. सरकारला जागं करण्यासाठी मनसे 27 नोव्हेंबरपासून औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढणार आहे.
सरकारने राज्यातल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे, मात्र सरकारकडून दुष्काळग्रस्तांसाठी कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत, त्यामुळे दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे नेते अनिल शिदोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
विरोधीपक्ष अाणि मनसेच्या दबावामुळे सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला मात्र सरकारने काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे मनसे दंडुका घेऊन रस्त्यावर उतरणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या मोर्चात मनसेप्रमुख राज
ठाकरे उपस्थित नसतील मात्र शेतकरी दंडुके घेऊन येतील, अन त्याचा सरकारवर
कसा वापर करायचा हे शिकवू, असंही त्यांनी सांगितलं.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम