घर विक्रीच्या वादावरून चुलत भावावर वार ! उपचार दरम्यान मृत्यू !

मारेकऱ्यांना अटक करावी या मागणी करिता संतप्त सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांचा पोलीस उप आयुक्त कार्यालयावर मोर्चा!

मुंबई (जीवन तांबे)जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक करीत नाही तो पर्यंत मृत्यूदेह त्याब्यात घेणार नाही या मागणी करिता सिद्धार्थ कॉलनीतील संतप्त नागरिकांनी पोलीस उपआयुक्त कार्यालयावर आज मोर्चा काढला परंतु हा मोर्चा पोलिसांनी मोनो स्टेशन खाली अडविला.

काकाने विकलेल्या घराचा अर्धा हिस्सा दिला नसल्याचा राग मनात ठेवून पुतण्याने काकांचा राग चुलत भावावर काढत सोमवारी रात्री त्याला आपल्या मित्रांसह गाठून त्याच्यावर चाकूने वार केले. 

बुधवारी त्याचा सायन रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.प्रफुल्ल सुभाष सवणे वय- 25 असेया  मृत्यू तरुणाचे नांव आहे.

मयत प्रफुल्ल याचे वडील हे आपल्या भावसह सिद्धार्थ कॉलनीतील घरात कित्येक वर्षांपासून रहात होते.मयत प्रफुल्लचे काका यांचे काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर काकांची पत्नी आपल्या मुलासह दुसरीकडे रहाण्यास गेली होती. 

प्रफुलच्या वडीलाने दोन वर्षापूर्वी राहते घर विकले व दुसरीकडे रहाण्यास गेले. परंतु विकलेल्या घराचा अर्धा हिस्सा आपल्या आईला दिला नसल्याचा राग मनात ठेवून आरोपीने आपल्या साथीदारासह ता. 8 फेब्रु रोजी रात्री ठीक. 8 वाजण्याच्या सुमारास मयत प्रफुल्ल याचा कुर्ला सिग्नल पासून पाठलाग करीत त्याला स्वस्तिक पार्क उद्यान जवळ गाठून त्याच्यावर चाकूने वार केले.

मला माझ्या मुलांकरिता मला जगू द्या अशी विनंती वारंवार प्रफुल्ल करत होता परंतु चुलत भावाने त्याच्या विनावणीला कोणतीही भीक घातली नाही.  उलट  साथीदारांसह प्रफुल्ल याच्या पोटात व छातीवर चाकूने 15 पेक्षा अधिक वार करून पलायन केले.

रक्तबंबाळ प्रफुल्ल मला वाचवा वाचवा अशी सर्वांकडे  मदत मागत असताना त्याच्या मदतीला कोणीही आले नाही. त्याचा एक मित्र कामावरून परत येत असताना जखमी प्रफुल्लला पाहून त्याने त्याची मदत मागितली त्याने काही मित्रांना बोलावून जखमीला जवळच्या श्रुशूत रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र परिस्थिती नाजूक असल्याने डॉकटरांनी त्याला सायन रुग्णालयात उपचाराकरिता  पाठविले असता बुधवारी त्याचा उपचार दरम्यान  मृत्यू झाला.

आरोपीना लवकरात लवकर अटक करावी या मागणी करीता संतप्त सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांनी बुधवारी रात्री बसंत पोलीस ठाणे व  आज पोलीस उपायुक्त कार्यालयावर  मोर्चा काढला परंतु पोलिसांनी मोर्चाकऱ्यांना सुस्वागतम नगर जवळ अडविले व त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी चार आरोपींना रात्री अटक केली असल्याचे सांगत आंदोलन शांत केले. 

या मोर्चात विविध पक्षातील कार्यकर्ते व महिला व युवक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.मोर्चा येणार म्हणून बंदोबस्ता करिता या मार्गावर मोठा पोलिसांनाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संबंधित पोस्ट