सामाजिक कृतज्ञता दिनी भिम आर्मीने उल्हासनगर ते वनंदगाव पर्यंत काढली आंबेडकरी समता रॅली.

भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला जातीविरहित भारताचा संकल्प.

मुंबई (प्रतिनिधी) पोटची चार लेकरं मृत्युमुखी पडली असतानाही केवळ भारतीय समाजाच्या उत्थानासाठी आपलं आयुष्य वेचणारी जगातील सर्वोच्च त्यागमूर्ती , भारतीय राज्यघटनेच्या महान शिल्पकाराची सावली , महामानवाची प्रेरणा , करोडो वंचितांची मायमाऊली , स्वतः क्रूर वेदनांचा उत्सव साजरा करून फाटक्या भारतीय समाजाला बंधुत्वाचे महावस्त्र नेसवून लोकशाहीच्या सर्वोच्च दागिन्यांनी सजविणारी आमची  वात्सल्याची करुणामूर्ती महामाता-राष्ट्रमाता , माता रमाई यांची १२३ वी महान जयंती ७ फेब्रुवारी रविवारी होती , त्यानिमित्ताने ह्या त्यागमूर्तीला , महामातेला अभिवादन करण्यासाठी ठाणे जिल्हा भीम आर्मीच्या वतीने उल्हासनगर ते वनंद गाव (तालुका:- दापोली , जिल्हा:- रत्नागिरी) अशी येऊनजाऊन सुमारे ५०० किलोमीटर अंतराची भव्य बाईक रॅली अर्थात आंबेडकरी समता रॅली काढण्यात आली होती.भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्हाप्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी , उल्हासनगर शहरप्रमुख म.कुमारभाई पंजवाणी आणि भिवंडी शहरप्रमुख मा.शोएबभाई मोमीन यांच्या नेतृत्वाखाली निघालेली सदरहू रॅली वस्त्यावस्त्यांत आंबेडकरी विचार पेरीत सायंकाळी ६ वाजता वनंद गावात जाऊन पोहचली.ह्या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे उल्हासनगर ते दापोली मार्गावर अनेक गावात ह्या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.अतिशय नियोजनबद्ध पार पडलेल्या ह्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या महिलांची आणि छोटे बच्चे कंपनीची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. ह्या रॅलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ७ फेब्रुवारी हा महान दिवस माता रमाईंच्या महान त्यागाचे स्मरण ठेवून   सामाजिक कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

७ फेब्रुवारी २०२१ रविवारी सकाळी ठीक ७.०० वाजता उल्हासनगरच्या सुभाष टेकडी येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भिमपँथर मा.राजेश गवळी , कुमारभाई पंजवाणी आणि शोएबभाई मोमीन ह्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी माता रमाईंच्या सर्वोच्च महान त्यागाचे स्मरण करीत जातीविरहित भारताची निर्मिती करण्याचा भीमसंकल्प करण्याची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली.ह्यावेळी उपस्थित विविध धर्मगुरू आणि प्रतिष्टीत नागरिकांच्या वतीने स्वतः भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी ह्या रॅलीस निळा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ केला.

ह्यावेळी कुमारभाई पंजवाणी , शोएबभाई मोमीन , पटेल साहेब , अमोल साहेब , शेरा खान , हरजितसिंग लबाना , किशोरभाई चव्हाण , नंदुभाई काळुंके , नानासाहेब वानखेडे , सुनीलभाऊ , पत्रकार दिपकजी मोरे , प्रितेश गवळी , कविताताई गवळी , ज्योतीताई भोसले , रंजिताताई बाविस्कर , चांदनी ठाकूर , कविता बागुल , रेश्माभाभी लबाना , खुशीदीदी पंजवाणी , अनमोल गवळी ,मन्नतदीदी लबाना , जगदीशभाई वर्मा असे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रॅलीतील प्रत्येकांनी शिस्त आणि शांततेचे उदात्त उदाहरण स्थापित करत , कोरोना संबंधीचे सर्व सरकारी नियम पाळून आयोजकांनी घालून दिलेल्या नियमांचेही पालन करीत हेल्मेटसक्ती अंमलात आणली , त्याबद्दल स्वतः भिमपँथर मा.राजेश गवळी , कुमारभाई पंजवाणी आणि शोएबभाई मोमीन ह्यांनी सर्वांचेच आभार व्यक्त केले.

संबंधित पोस्ट