तृतीयपंथीय तक्रारनिवारण समितीवर,सदस्य नियुक्तीकरिता संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि. 8 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्यांचे व तक्रारींचे जलदगतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली  आहे. या समितीमध्ये तृतीयपंथीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची सदस्य म्हणून नियुक्ती करावयाची असून संबंधित इच्छुकांना संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा, सहायक आयुक्त यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

जिल्हास्तरीय समिती गठीत करत असताना समितीमध्ये सदस्यांची नेमणूक करणेसाठी,  तृतीयपंथीयासाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थांतील 2 तृतीयपंथीय व्यक्ती (त्या पैकी किमान एक व्यक्ती Transwoman असणे आवश्यक) यांची नेमणूक करावयाची आहे. तसेच जिल्हाधिकारी,  मुंबई उपनगर यांच्या मान्यतेने सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी एक व्यक्ती समितीवर नियुक्त करावयाची आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संबंधित संस्था व व्यक्तींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, 4था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई - 400 071, या पत्त्यावर किंवा दुरध्वनी क्र. 022 25222023 Email:-spldswo_mumsub@yahoo.co.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट