
सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते र. ग. कर्णिक यांना गोदी कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
- by Reporter
- Feb 08, 2021
- 482 views
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे व कामगार संघटना कृती समितीचे ज्येष्ठ कामगार नेते मा. र. ग. कर्णिक यांचे आज दुपारी वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. सरकारी कर्मचाऱ्यांचा व कामगार चळवळीचा आधारवड कोसळला. र. ग. कर्णिक, डॉ. शांती पटेल, एस. आर. कुलकर्णी, मनोहर कोतवाल, कॉ. यशवंत चव्हाण, कॉ. ए. डी. गोलंदाज अशा अनेक दिग्गज कामगार नेत्यांनी सरकारच्या व मालकांच्या कामगार धोरणाविरुद्ध एकजुटीने आवाज उठविला. कामगार हितासाठी कामगार संघटना कृती समितीमध्ये र. ग. कर्णिक यांनी पुढाकार घेऊन अनेक आंदोलने केली. सरकारी कर्मचाऱ्यांचा व कामगार चळवळीचा आधारवड हरपला. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने ऍड. एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज, डॉ. यतीन पटेल, मारुती विश्वासराव, व युनियनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, गोदी कामगार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
रिपोर्टर