हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर यांच्या विवा समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता अखेर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केली जप्त
- by Adarsh Maharashtra
- Feb 08, 2021
- 487 views
मुंबई :पीएमसी बँकेतून कर्ज घेऊन त्या रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी काही उद्योगसमूह 'ईडी'च्या रडारवर आहेत. या अंतर्गत 'ईडी'ने मागील महिन्यात 'विवा समूहा'ची कार्यालये; तसेच ठाकूर बंधूंच्या घरांवर छापे टाकले होते. छाप्यादरम्यान हाती आलेल्या माहितीच्या आधारे ठाकूर यांची अंधेरीतील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 'ईडी'तील सूत्रांनुसार, अंधेरी पूर्वेकडील कॅलेडोनिया इमारतीतील मालमत्ता 'मॅक स्टार' या कंपनीने बांधली आहे. 'मॅक स्टार' ही हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. 'एचडीआयएल' ही पीएमसी बँक घोटाळ्यातील सर्वांत मोठी कर्जबुडवी कंपनी आहे. एचडीआयएल, मॅक स्टार व विवा समूह यांचे संगनमत असल्याचे 'ईडी'च्या तपासात समोर आले. त्यावरूनच अंधेरीतील कारवाई करण्यात आली.
'एचडीआयएल'चे राकेश व सारंग वाधवान यांनी 'मॅक स्टार'च्या अंधेरीतील मालमत्ता बेकायदा 'विवा समूहा'कडे वळवल्या. त्यामध्ये दोन कार्यालयांचा समावेश असून त्यांची किंमत ३४ कोटी ३६ लाख रुपये इतकी आहे. यामुळेच त्या जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे, या दोन मालमत्तांची कागदोपत्री किंमत फक्त ३४ लाख ३६ हजार इतकीच दाखविण्यात आली आहे. त्यापोटी 'विवा समूहा'ने 'मॅक स्टार'ला ३७ चेक दिल्याचे तपासात आढळले आहे. राकेश वाधवान यांनी एचडीआयएल कंपनीमार्फत विवा समूहाचे संचालक मेहुल ठाकूर यांना मोठ्या प्रमाणात निधी वळवला. मुख्य म्हणजे, 'एचडीआयएल'ने येस बँकेचे कर्जदेखील बुडवले आहे. या सर्व कर्जाऊ रक्कमेचा एचडीआयएल; तसेच विवा समूहाने गैरवापर केल्याचे दिसून येत असल्याचे 'ईडी'चे म्हणणे आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम