नाते शब्दांचे साहित्य मंच आयोजित पहिले राज्यस्तरीय काव्यसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.

मुंबई (भारत कवितके) रविवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी नाते शब्दांचे साहित्य समुह अंतर्गत वनमाला पाटील यांच्या ' खानदेशचा खजिना 'या अहिरणी बोली भाषेतील पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कोपरगांव येथील यमुनाबाई वाघ सभाग्रहात कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले.तर ख्वाडा,व बबन फेम अभिनेत्री स्नेहल भांगे यांना मान्यवरांच्या हस्ते कलाविष्कार सन्मान प्रदान करण्यात आला.यावेळी संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक बाबुराव उपाध्ये यांनी मार्गदर्शनकरताना सांगितले की, 'जग वेगाने बदलत आहे हे प्रसार माध्यमा मुळेच.व्हाटसप सारख्या प्रसार माध्यमामुळे आमची पुस्तके कुणी वाचत नाहीत,यांची खंत वाटते.पण नाते शब्दांचे साहित्य समुहाने अनेक साहित्यिका कविना,समाजसेवकांना एकत्र बांधण्याचे काम केले आहे.दुर्लक्षित साहित्यिकांना समाज सेवकांना समाजापुढे आणण्याचे काम नाते शब्दांचे चे समुहाच्या काळे व निंबाळकर यांनी केले आहे.शब्दांनी जोडतात माणसं ,शब्दांनी तुटतात माणसं,आपल्या जीवनात साहित्याला खूपच महत्व आहे,पण समाजात साहित्यिकांचा पाहिजे तसा गौरव होत नाही.'यावेळी भारत कवितके यांची ' विठू तुझी पंढरी', अशोक आगरकर यांची ' पायवाट ' विजय कांबळे यांची ' आई ' संध्याराणी यांची षटकोळी,शबाना तांबोळी प्रतिभा बोबे,रेखा बावा,कल्पना निंबोकार सुनिता इंगळे,रेणुका हजारे,गुलाबराजा फुलमाळी या कवितांनी संमेलनात रंगत आणली.तर काही कवयित्रीना ' हिरकणी पुरस्कार देण्यात आले.पत्रकाराना पेंशन योजना सुरू करण्यास सरकारला भाग पाडणारे पत्रकार प्रकाश कुलथेचा विशेष उल्लेख अध्यक्षांनी केला.या प्रसंगी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,साहित्यिक पद्मकांत कुदळे,वनमाला पाटील,संध्याराणी कोल्हे स्नेहल भांगे आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते,सडेतोड व खुशखशीत सूत्रसंचालन सुनिता इंगळे यांनी करून संमेलनाची रंगत वाढविली.बाळासाहेब देवकर,चंदनसुशिल तरवडे,आरती कोरडकर धनंजय जगताप,दिपक सोनावणे,विलास नवसागरे,व समुह प्रमुख काळे व पंडीत निंबाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट