सराईत बाईक चोरट्यांकडून ११ बाईक हस्तगत
- by Adarsh Maharashtra
- Feb 06, 2021
- 753 views
डोंबिवली :(प्रतिनिधी)अनलॉक काळा पासून जिह्यात बाईक चोरीच्या घटनात कमालीची वाढ झाली असतानाच मानपाडा पोलिसांनी दोघा सख्या भावासह साथीदाराला सीसीटीव्ही फुटेजमुळे गजाआड करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या चोरट्या त्रिकूटाकडून पर्यंत 11 महागड्या चोरीला गेलेल्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती कल्याण पोलीस परिमंडळचे पोलीस उपा आयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
योगेश महेश भानुशाली (30) आणि मुकेश महेश भानुशाली (34) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार समीर उर्फ अक्रम सय्यद याचा पोलिस शोध घेत आहेत. डोंबिवलीतील मिलापनगर भागातून एक रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट २७ जानेवारी रोजी चोरीस गेली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश डांबरे यांच्या नेतृत्वाखाली भानुदास काटकर, संतोष भुंडरे, प्रतिम काळे, भगवान चव्हाण, दिलीप किरपण, अनिल घुगे, सुधाकर भोसले, सोपान काकड या पथकाने आरोपी भानुशाली बंधूकडून 4 लाख 90 हजार रुपयांच्या 11 बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत. या चोरट्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2, तसेच विष्णूनगर, हिललाईन, मुंब्रा आणि नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक, अश्या 11 विविध कंपनीच्या दुचाक्या लंपास केल्या होत्या. या सर्व दुचाक्यांची एकूण किंमत पाहता 4 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आणखी काही दुचाक्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम