महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केली. यासंदर्भात अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचे श्री.मलिक यांनी सांगितले.

वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार ‘राज्यातील मुस्लिम संसद सदस्य’ या संवर्गातून या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया तेहसीन अहमद खान आणि लोकसभा सदस्य सय्यद इम्तियाज जलील यांना औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात येत असल्याबाबत अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट