
वीज दर वाढ विरोधात भाजपचा विविध अदानी वीज कार्यालवर मोर्चा!
- by Reporter
- Feb 05, 2021
- 326 views
मुंबई (जीवन तांबे)अदानी वीज कंपनी आपल्या ग्राहकांना भरमसाठ वीज देयके पाठवीत असल्याच्या निषर्धात भाजपच्या वतीने अदानी वीज कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला.देशभर पसरलेले कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही.
या कोरोनामुळे कित्येकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ असताना देखील राज्य सरकारने वीज बिल माफ करणार असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन त्यांनी पुरे केले नसल्याच्या निषेर्धात भाजप कार्यकर्त्यांनी आज चेंबूर, घाटकोपर, सांताक्रूझ,दिंडोशी, वडाळा, कांदवली, येथील अदानी वीज कार्यलयावर मोर्चा काढत राज्य सरकार, मोदी सरकार व अदानीचा निषेध केला.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी वीज बिल फाडत राज्य सरकार व अदानी वीज कंपनीच्या विरोधात घोषणा दिल्या.
यावेळी भाजप माजी मंत्री विद्या ठाकूर, आमदार भाई गीरकर, राहुल वाळंज, नगरसेवक आशा मराठे, नगरसेवक सुशांत सावंत, सुभाष मराठे तसेच अनेक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते.
रिपोर्टर