उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनिकेत दुर्गेचा सत्कार

गोंडपिपरी (प्रतिनिधी) मूळचा गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे राहणारा व गोंडवाना विद्यापीठाच्या सुशीलाबाई रामचंन्द्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथे समाज कार्याचे शिक्षण घेत असलेला  विद्यार्थि अनिकेत नामेश्वर दुर्गे या विद्यार्थाला या वर्षीचा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. उदय सामंत  यांच्या हस्ते विद्यापीठ उत्कृष्ट विद्यार्थी हा सन्मान देवून गौरवण्यात आले.सदर पुरस्कार कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी सर,आमदार देवराव होळी व इतर सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.  अनिकेत हा महाविद्यालयात सुद्धा झालेल्या अनेक कार्यक्रमात नेतृत्व गुणांनी सन्मानित करण्यात आले होते. लाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करत संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित झालेले लोकडाऊन ज्ञान शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. काहीच दिवसापूरवीच त्याने या ज्ञानशाळेचे समारोप, शाळा सुरू होण्याच्या प्रक्रियेत केला.सोबतच अनेक पथनाट्य करत युवापिढी ला सामाजिक भान देण्याचे कार्य अनिकेत खूप उत्साहाने करत अनेक ठिकाणी त्याच्या कार्याची दखल घेत त्यांच्यासारखेच तरुण पुढे येऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्ञान शाळेचे शाखा खुले करत इत्तर युवावर्गाणी ज्ञान शाळा चालवण्याचे आव्हान स्वीकारत आपला सहभाग नोंदविलेले आहे.वक्तृत्व ,पथनाट्य व अनेक सामजिक उपक्रमाची दखल घेता अनिकेत सारखेच तरुण आपल्या राष्ट्राची नवं निर्मिती करू शकतात हे स्पष्ट आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अशा नेतृत्वाची शिकवण देणारे एखदेतरी उपक्रम राबवले तर निक्कीच युवा पिढी आपल्या देशासाठी नेतृत्व करण्यास स्वतः पुढे येईल.त्याने आपल्या यशाचे श्रेय  महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच आपल्या आई वडिलांना दिले आहे. या यशाबद्दल प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करत सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट