विक्रोळी परिसरात फेरीवाल्यांकडून 10 रुपयेची पावती देऊन शिवसेना कार्यकर्ते करतात वसुली! फेरीवाले त्रस्त !

मुंबई (जीवन तांबे) विक्रोळी येथील फेरीवाल्यांना  शिवसेना शाखा क्रमांक 118 वतीने फेरीवाल्यांना दहा रुपयांच्या पावती वसुल केले जात आहेत.

हे काम पालिकेचे असताना हे चक्क शिवसेना कार्यकर्ते करीत असल्याने फेरीवाले संताप व्यक्त करीत आहे. 

विक्रोळी परिसरात फेरीवाल्यांना ज्या दहा रुपयांच्या पावत्या देण्यात येत आहेत त्यावर चक्क  शिवसेना शाखा क्रमांक 118 असे लिहिले  असून त्यापावतीवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार सुनील राऊत आणि नगरसेवक उपेंद्र सावंत यांचे छायाचित्रे छापण्यात आले आहे. सार्वजनिक पदपंथाचा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलन करण्यासाठी आकार असे त्या पावतीवर लिहिले आहे. फेरीवाले यांच्या कडून कोणत्याही कराच्या किव्हा दंडाच्या स्वरूपात पैसे वसुली करण्याचे काम महापालिकेचे असताना शिवसेना फेरीवाल्या कडून 10 रुपयांची पावती देऊन  पैसे वसूल करीत आहे. शिवसेनेचा नक्की उद्देश काय ?

असा सवाल मनसे केला असून पालिका प्रशासन ही यांना मदत करीत असल्याचा आरोप मनसेने पदाधिकारी यांनी केला आहे.

संबंधित पोस्ट