यंदा विकासकामांवर १८ हजार कोटी खर्च होणार – पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल

मुंबई, दि.३(अल्पेश म्हात्रे)  आज झालेल्या पालिका  अर्थसंकल्पानंतर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी बोलताना त्यांनी २०२०-२०२१ च्या पालिका बजेटमध्ये १४ हजार ६३४ कोटी भांडवल रक्कम होती. त्यातील ३५ ते ४८ रक्कम म्हणजे एकूण १८ हजार कोटी एवढी रक्कम विकास कामांवर खर्च होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबईचा विकास होण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण असायला हवे यासाठी आम्ही सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहोत. मुंबईतील कफ परेड, मरीन ड्राईव्ह या शहरांचे विकास कामांचे अधिकार एमएमआरडीएकडे आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची मागणी आहे की आम्हाला मुंबई महापालिकेमध्ये  सामावून घ्या. त्यामुळे सरकराने जर याला परवागणी दिली तर या दोन्ही भागात महापालिकेचे  अधिकार असणार आहे. यासाठी आम्ही लेखी प्रस्तावही सरकारला दिला आहे. अशी मागणी यावेळी आयुक्तांनी केली. या विकास कामातील महत्वाचा खर्च हासागरी मार्गावर  करण्यात येणार आहे. यावर्षीच्या २  हजार कोटींचा खर्च सागरी मार्गासाठी  असणार आहे, तर मिठी नदीच्या विकास खोलीकरण रुंदीकरणासाठी ३१७२ कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. तसेच देवनार कत्तलखाना यासाठी आम्ही निविदा काढतो आहे यासाठी ४७२ कोटी तरतूद करणार असल्याचे यावेळी चहल यांनी स्पष्ट केले.           

मराठी रंगभूमी कलादालनाच्या विकासासाठी पालिकेने विशेष तरतुद केली आहे. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात ५ गार्डन तयार केले जाणार असून १६० किमीचे १४९ फुटपाथ बांधले जाणार आहेत. तसेच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी पालिका १२८वाहतूक बेटे  बांधणार आहे. तसेच मुंबईच्या प्रत्येक भागात एकूण २० हजार ३०१ स्वच्छतागृह  बांधणार असून १०८ कम्युनिटी टॉयलेट्स बांधण्याची तरतुद या बजेटमध्ये आहे. मुंबईतील अंधेरी पुल दुर्घटनेनंतर पालिकेने आता रेल्वेच्या १२  पुलांचे काम हाती घेणार आहे. तसेच कोरोना काळात मुंबईतील हॉस्पीटल्स दैना पाहता मुंबईत ५ नवे हॉस्पिटलसाठी निविदा मान्य केल्या आहेत. असे त्यांनी सांगितले.तसेच मुंबईचा विकास होण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण असायला हवे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. .

संबंधित पोस्ट