कोस्टल रोडसाठी अर्थसंकल्पात १ हजार ५०० कोटींची तरतूद

मुंबईयंदा कोस्टल रोड  प्रकल्पासाठी यंदाच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात २ हजार कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. २०२०-२१ या वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद १ हजार ५०० कोटी इतकी असून त्यामधून आजपर्यंत १ हजार १८९.७५ कोटी इतका खर्च झालेला आहे.

मुंबईतील सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड)चे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले. सध्या छोटा चौपाटी, प्रियदर्शनी पार्क, अमरसन्स गार्डन, हाजी अली जंक्शन आणि वसरळी सी फेस येथील काम सुरू आहेत. कोस्टल रोड प्रकर चार वर्षात पूर्ण करण्याचे ठरविले आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या बांधकामाचा अंदाजित खर्च ८ हजार ४२९ कोटी इतका आहे. त्यामध्ये कर, पर्यवेक्षण आकार, सल्लागार शुल्क आणि इतर सामाविष्ट केल्यास एकूण प्रकल्प खर्च १२ हजार ९५० कोटी इतका आहे. आता यंदा कोस्टल रोड प्रकल्पासाठी महापालिकाने २ हजार कोटींची तरतूद केली आहे.

संबंधित पोस्ट