समाजसमर्पित माता लक्ष्मीआई आंबेडकर यांच्या तेलंगे गावातील महान स्मारकासाठी भीम आर्मी सर्वोतोपरी सहकार्य करणार.

भिमपँथर मा.राजेश गवळी यांची घोषणा.

मुंबई (प्रतिनिधी) भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आणि बाबासाहेबांना पूर्णवेळ समाजासाठी झटता यावे , लढता यावे म्हणून सांसारिक किल्ला लढविणारे ,  बाबासाहेबांचे  मोठे बंधू आनंदराव अर्थात दादासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांगिनी तसेच महामाता रमाई यांच्या थोरल्या जाऊबाई व दादासाहेब आंबेडकरांना खंबीरपणे साथ देणाऱ्या , समाजासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या समाजसमर्पित माता लक्ष्मीआई आनंदराव आंबेडकर यांचे २१ एप्रिल १९४० रोजी महाड तालुक्यातील तेलंगे ह्या गावात परिनिर्वाण झाले.त्यानंतर सुमारे ३६ वर्षानंतर म्हणजे २१ एप्रिल १९७६ रोजी निर्वाणस्थळी त्यांची समाधी उभारण्यात आली. परंतु ही समाधी दुर्लक्षित राहिल्याने तिची जीर्णावस्था झाली होती.

सदरहू समाधीचा शोध लागताच मान्यवर राजरत्न आंबेडकर साहेबांनी ह्या समाधीची डागडुजी करून तिथे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प केला असून , राजरत्न साहेबांच्या ह्या महान कार्यात भीम आर्मी , ठाणे जिल्ह्याच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याची घोषणा भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केली आहे.

लवकरच भिमपँथर मा.राजेश गवळी आणि उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसमवेत सदरहू स्मारकस्थळी भेट देणार आहेत.ह्या कामी आंबेडकरी समाजाने पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा भिमपँथर मा.राजेश गवळी आणि कुमारभाई पंजवाणी ह्यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट