
टिम ओमी कलानीच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या मतभेदातुन वाढदिवसांच्या अनधिकृत बँनरमुळे शहराच्या विद्रुपी करणात भर.
उल्हासनगर आयुक्त यांचेवर कारवाई करणार काय .
- by Rameshwar Gawai
- Jan 31, 2021
- 541 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : टिम ओमी कलानीचे दोन पदाधिकारी रोशन माखीजा आणि पंकज त्रिलोकानी या दोघांचेही वाढदिवस एकाच दिवशी ३० जानेवारी असल्याने टि.ओ.के च्या कार्यकर्त्यांनी उत्साहात ठिकठिकाणी या दोघांच्या वाढदिवसाचे वेगवेगळे बँनर लावुन साजरा केला आहे .
विशेष म्हणजे रोशन माखीजा हे टि.ओ.के चे युथ उपाध्यक्ष तर पंकज त्रिलोकानी युथ कार्याध्यक्ष आहेत.मागील वर्षापर्यंत दोघांचे फोटो एकाच बँनरवर लावुन वाढदिवस साजरा केला जात होता.मात्र मागील वर्षापासुन दोघांमध्ये पदाबाबत वाद निर्माण झाल्याने आपआपसात मतभेद निर्माण झाले आहेत . आणि या मतभेदातुन या वर्षी दोघांचे ही स्वतंत्र फोटो वेगवेगळ्या बँनरवर झळकु लागले आहेत.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा त्यांच्या मतभेदातुन स्वतंत्र बँनर यातही दोघांत स्पर्धा निर्माण झाल्याने शहरभरात दोघांच्याही स्वतंत्र बँनरचा सुळसुळाट झाला आहे.मात्र या मतभेदातुन शहरभर बँनर लावुन शहराचे विद्रुपीकरण होत आहे.ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही.ज्या ठिकाणी बँनर लावण्यास मनाई आहे अशा ठिकाणीही त्यांनी बँनर लावुन महापालिकेचा नियमांचा भंग केला आहे.परवानगी नसतांना स्वतःच्या वाढदिवसाचे बँनर लावले म्हणून उल्हासनगर महापालिका त्यांचेवर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे.या बँनर युद्धात काही ठिकाणी बँनर फाटल्याचे ही निदर्शनास आले आहे.आता हे बँनर कोणी फाडले हा सुध्दा एक चौकशीचा भाग आहे.अती बँनरमुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन जीवघेणे अपघात घडु शकतात हे सुध्दा दोघे पदाधिकारी विसरुन गेले आहेत.उल्हासनगर महापालिके ने यापुर्वी अशा अनेक बँनरवर कारवाई केलेली आहे.मात्र टिम ओमी कलानी ही उल्हासनगर महापालिका सत्तेत सहभागी असल्याने महापालिका प्रभागातील अधिकारी व महापालिका आयुक्त यांचेवर कारवाई करतात किंवा नाही हे पाहणे सुद्धा रंजक ठरणार आहे.दरम्यान फाटलेल्या बँनरबाबत अजुन पर्यंत कोणतीही तक्रार नसल्याबाबत टिम ओमी कलानीचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी फोनवरुन संपर्क साधला असतांना सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम