मुलुंड पोलिसांच्या मोर्चा हाताळण्याच्या कुशल कौशल्यावर आंदोलनकर्ते खुश

मुलुंड:(शेखर भोसले) इगतपुरीहून मंत्रालयापर्यंत पायी जाणाऱ्या अनुदानित वसतीगृह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या १ हजार मोर्चेकरांना, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होवू न देता मुलुंड पूर्व टोलनाक्यांवरून मंत्रालयापर्यंत पायी न पाठवता बसने सुखरूप प्रवास घडवून आणल्याने मोर्चेकरी खुश झाले असून झोन ७ चे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम, मुलुंडचे सहा. पो. आयुक्त प्रिया ढाकणे यांच्या कुशल नेतृत्वगुणाबद्दल, व त्यांच्या नेतृत्वाखाली  नवघर पोलिस ठाण्याचे व.पो.नि. सुनिल कांबळे आणि सर्व अधिकारी, अंमलदार यांनी केलेल्या या अतुलनीय कार्याबद्दल, मोर्चेकऱ्यांचे केलेल्या आदरातिथ्याबद्दल तसेच अत्यंत संयमाने आणि कल्पकतेने  मोर्चा हाताळल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.


पोलिस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार दि. २५ जानेवारी रोजी शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने पोलिस बंदोबस्त चालू होता. परिमंडळ ७ चे उपायुक्त प्रशांत कदम यांच्या कार्यक्षेत्रात मुलुंड मधील तिन्ही टोलनाके येत असल्याने योग्य नियोजन करून बंदोबस्त लावून उपायुक्त प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन होते.
तिन्ही टोलनाक्याची जबाबदारी मुलुंडच्या सहा. पो. आयुक्त प्रिया ढाकणे सक्षमपणे हाताळत होत्या. मुलुंड आणि नवघर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी दि २५ जानेवारीचा बंदोबस्त आणि २६ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणारा प्रजासत्ताक दिन अशा दुहेरी भूमिकेत स्वतःला सज्ज ठेवून होते. अश्यातच २५ जानेवारी रोजी दुपारी पोलिसांना एक मेसेज आला की इगतपुरी नाशिक येथून १ हजार लोकांचा अनुदानित वसतिगृह कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एक मोर्चा पायी निघाला असून तो २६ जानेवारी रोजी लॉन्गमार्च करीत मंत्रालयपर्यंत जाणार आहे आणि आता हा मोर्चा भिवंडी पर्यंत पोचला आहे. 

मिल स्पेशल कसार यांनी सदर माहिती वपोनि सुनिल कांबळे यांना सांगितली. त्यांनी तात्काळ सदर माहिती सहा.पो.आयुक्त प्रिया ढाकणे आणि उपायुक्त प्रशांत कदम यांना  सांगितली. क्षणाचाही विचार न करता 
उपायुक्त प्रशांत कदम यांनी अपर पोलीस आयुक्त संजय दराडे आणि पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था, मुबंई शहर विश्वास नांगरे पाटील यांना कल्पना दिली.

असे मोर्चे हाताळण्यात निष्णात असणारे दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा दिवस आणि पायी मोर्चा हा विरोधाभास लक्षात घेतला आणि अचूक निर्णय घेत महत्वाच्या सूचना संबंधितांना केल्या. 'मोर्चा पायी मुबंईतून जाता कामा नये. त्यांना मुबंईत येऊ द्यावे पण वाहनाने... प्रजासत्ताक दिन आहे' वरिष्ठांच्या सूचना मिळाल्या ....

उपायुक्त प्रशांत कदम आणि सहा.पो.आयुक्त प्रिया ढाकणे यांनी नवघर ठाण्याचे वपोनि सुनील कांबळे साहेब, पोनि संजय खेडकर यांना सोबत घेऊन रणनीती ठरवली. वरिष्ठांना वेळोवेळी प्लॅन सांगून अनुमती मिळवून एकामागोमाग एक धडाधड निर्णय घेतले. 
मोर्चेकऱ्यांचा सन्मान ठेऊन पायी मोर्चा मुबंईत प्रवेश करता कामा नये असे ठरले. मोर्चेकऱ्यांना समजावून २६ जानेवारी पर्यंत थांबवायचे व २७ जानेवारीला वाहनाने आझाद मैदान येथे सन्मानपूर्वक सोडायचे, असे ठरले. अतिशय नाजूक जबाबदारी होती.

उपायुक्त प्रशांत कदम आणि सहा.पो.आयुक्त प्रिया ढाकणे यांनी सदर मोर्चाला कोपरी येथील जकात नाक्याजवळ थांबवण्याचे ठरवले. तेथेच त्यांना २६ जानेवारीच्या दिवशी थांबवायचे आणि २७ जानेवारीला वाहनाने आझाद मैदान येथे नेऊन सोडायचे असे ठरले. ही खरंतर तारेवरची कसरतच होती.
मोर्चा आला. सर्व अधिकारी, उपायुक्त प्रशांत कदम आणि सहा.पो.आयुक्त प्रिया ढाकणे  यांच्या नेतृत्वात मोर्चाला सामोरे गेले. मोर्चाचे हास्यवदनाने स्वागत केले. त्याने मोर्चा गोंधळला. मुबंई पोलीस आपले स्वागत करीत आहेत हे बघून मोर्चेकरी गडबडले  उपायुक्त प्रशांत कदम यांनी त्यांना, 'आपण खूप लांबून आलात. थोडा आराम करा. आमचा थोडा पाहुणचार घ्या. मग पुढे जा' असे सांगितले. मुंबई पोलिसांच्या या सौजन्यभावाने मोर्चेकऱ्यांपुढे नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.

कोपरी जकातनाक्यात दोन शौचालये आहेत. विसाव्याला जागा ठेवली आहे. आपण आज रात्री विश्राम करावा असे त्यांना विनंती केली. मुंबई पोलिसांचे आदरातिथ्य पाहून मोर्चा आंनदला. थांबायला तयार झाला. त्यांची जेवण्याची व्यवस्था करण्यात आली. पहिला टप्पा पार झाला.

आता दुसरा टप्पा....
सकाळी ९ वाजता डीसीपी कदम, एसीपी ढाकणे, नवघर पोलीस ठाण्याचे वपोनि कांबळे, का व सु चे पोनि खेडकर हे झेंडावदंन करून मोर्चेकऱ्यासमोर हजर झाले. आणि डीसीपी कदम आणि एसीपी प्रिया ढाकणे यांची खरी रणनीती सुरु झाली. आजचा दिवस मोर्चेकऱ्यांना येथेच थांबवण्याची.

बोलाचाली सुरु झाल्या. डीसीपी कदम यांनी वर फोन करून २७ जानेवारीची मान्यवरांची मोर्चाच्या प्रतिनिधीं सोबत भेट मिळवली. त्यांना त्याची खात्री दिली. मोर्चा आंनदला. थांबण्यास तयार झाला. त्यांना पुन्हा चहापाणी, जेवण वगैरेची व्यवस्था करण्यात आली.कौशल्याने आणि कल्पकतेने दोन्ही वरिष्ठांनी यशस्वी मध्यस्थी करून दुसरा टप्पा पार केला.

आता तिसरा अखेरचा टप्पा.....
संध्याकाळी परत डीसीपी कदम आणि एसीपी प्रिया ढाकणे यांनी सरळ १० बस मागवून कोपरी जकातनाक्यात उभ्या केल्या. मोर्चेकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. वातावरण तापू लागले. आम्ही चालतच जाणार. पुन्हा डीसीपी कदम, एसीपी ढाकणे आणि अधिकारी यांची समजावणी परेड सुरु झाली.

मोर्चेकऱ्यांना मुबंईची टोपोग्राफी, पायी जाण्यातले संभाव्य धोके, ट्राफिक समस्या यांची जाणीव करून देत अतिशय शांतपणे आणि सौजन्याने समजावण्यात आले  डीसीपी प्रशांत कदम यांच्या नेतृत्वगुणांची प्रचिती मोर्चेकऱ्यांना आणि बंदोबस्तवरील प्रत्येक अधिकाऱ्यांना   जाणवली.

आणि अखेर २७ जानेवारीला सर्व मोर्चेकऱ्यांना 'त्यांना न्याय मिळो', ही सदिच्छा देत अतिशय प्रेमाने बसगाडीत बसवून आझाद मैदान येथे सोडण्यात आले.

बसगाडीत बसताना मोर्चेकरी उपायुक्त प्रशांत कदमआणि सहा.पो.आयुक्त प्रिया ढाकणे   आणि सर्व मुबंई पोलिसांचे आभार मानत, केलेल्या व्यवस्थाबद्दल धन्यवाद देत होते.

अशा रीतीने दि. 24 जानेवारी ते 28 जानेवारी असे दिवसरात्र एक करीत विभाग क्र. ७ चे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम  आणि मुलुंडच्या सहा.पो.आयुक्त प्रिया ढाकणे, वपोनि सुनील कांबळे आणि नवघर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, अंमलदार यांनी अतिशय संयमाने सदर स्थिती हाताळत आणि कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देता मुबंई पोलिसांच्या धिरोदात्त, संयमी आणि तितकेच कणखर पणाची प्रचिती दिली. यामुळे आंदोलन कर्त्यांसह सर्वच जण मुबंई पोलिसांचे आभार, धन्यवाद मानत तोंडभरून कौतुक करीत आहेत.

संबंधित पोस्ट