राज्यसरकार व रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना रेल्वे प्रवास सेवा बरोबर रेल्वे स्थानकातील सरकते जिने, उदवाहन, शौचालये सुविधा देण्याच्या मागणीला मुंबईकरांचा जोर!
- by Reporter
- Jan 31, 2021
- 835 views
मुंबई (जीवन तांबे) मुंबईतील सर्व सामान्य जनतेला राज्यसरकारने रेल्वेने प्रवास करण्यास मुभा दिली असली तरी रेल्वे प्रशासनाने मुंबईतील रेल्वे स्थानकातील सरकते जिने, उदवाहन, शौचालये, काही गेट अद्याप रेल्वे प्रशासनाने सुरू केले नसल्याने कित्येक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर रेल्वे स्थानकांत प्रवाशांना सुविधा दयावी अशी मागणी प्रवासी करीत आहे
कोरोनाचे सावट संपूर्ण देशभर असल्याने त्याचे पडसाद मुंबईत मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोना आळा घालण्याकरिता राज्य सरकारने लोकडॉऊन मार्च महिन्या पासून सुरू केला त्यामुळे रेल्वे सेवा मार्च महिन्यापासून ठप्प होती.आता हळूहळू लॉकडॉउनचे नियम स्थितील होते
कामगार व महीलांकरिता रेल्वे वेळचे बंधन घालून सुरू करण्यात आली. परंतु सर्व सामान्य जनतेकरिता रेल्वे कधी सुरू होणार या प्रतीक्षेत असलेल्या जनतेला आता राज्य सरकारने ता .1 फेब्रु पासून सर्व वेळेचे बंधन आखून रेल्वे सुरू करणार असली तरी रेल्वे प्रशासनाने
मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकातील सरकते जिने, लिफ्ट, शौचालये सुरू करावीत तसेच युटीएस, ए टीव्हिएम,जेटीबीएस सेवा सुरू करून सिजन तिकीट व सिजन तिकिटांची मुदत, तिकीट खिडक्यात वाढ तसेच बाहेर गावी जाणाऱ्या गाड्या लवकर सुरू कराव्यात याबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्रव्यवहार केला आहे.
काही जिन्याने जाण्यास बंदी केली आहे. त्यामुळे तिकीट घर ही दुसऱ्या ठिकाणी असल्याने नागरिकांना शोधण्यात दमछाक होत आहे. तिकीट खिडकी एक सुरू असल्याने वाढत्या संख्येनुसार ती कमी पडत आहे. त्यामुळे भली मोठी रांग लावी लागत आहे. काहींना तर लिफ्ट व सरकते जिने नसल्याने शारीरिक त्रास सहन करावे लागत आहे.
रेल्वे प्रशासाने सर्व जनतेला रेल्वे प्रवास करण्या मुभा द्यावी तसेच सध्या जे प्रवास करीत आहे त्यांना सर्व स्थानकात सर्व सुविधा देण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा तामिळ सेल मुंबई अध्यक्ष राजा उडयार यांनी दिला आहे.
रिपोर्टर