अंधेरीत साई पार्वती सोसायटी परिसरात मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन
- by Reporter
- Jan 29, 2021
- 654 views
मुंबई (प्रतिनिधी)अंधेरी पूर्व येथील साई पार्वती सोसायटी परिसरात मोफत वृत्तपत्र
वाचनालयाचे उद्घाटन स्थानिक आमदार रमेश लटके यांच्या हस्ते करण्यात आले . साई पार्वती सोसायटीच्या परिसरातील सर्व सभासदांमध्ये वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण व्हावी त्या हेतूने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला
असल्याचे साई पार्वती सोसायटीचे अध्यक्ष संजू बावदाणे यांनी सांगितले. यावेळी साई पार्वती सोसायटीतील रहिवासी आणि स्थानिक पत्रकार अनंत शितकर , सचिव तुकाराम नांदिवडेकर , खजिनदार दिनकर बैकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.तसेच मुक्त पत्रकार अनंत दाभोळकर यांनी या मोफत वाचनालयाला सदिच्छा भेट दिली.या मोफत वाचनालयात दैनिक वृत्तमानस, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सामना , नवाकाळ, पुण्यनगरी, पुढारी, लोकमत, सकाळ, नवशक्ती, इत्यादी दैनिके आणि साप्ताहिक मार्मिक, लोकप्रभा, चित्रलेखा , सर्व चोखंदळ
वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. साई पार्वती सोसायटीच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री.सत्यानारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती.अशी माहिती अनंत दाभोळकर यांनी दिली.
रिपोर्टर