माता रमाईंच्या जन्मदिनी उल्हासनगर ते वनंद अशी आंबेडकरी समता रॅली काढून सामाजिक कृतज्ञता दिन म्हणून साजरा करणार.
भिमपँथर मा.राजेश गवळी यांची घोषणा.
- by Reporter
- Jan 29, 2021
- 717 views
मुंबई (प्रतिनिधी) पोटची चार लेकरं मृत्युमुखी पडली असतानाही केवळ भारतीय समाजाच्या उत्थानासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारी जगातील सर्वोच्च त्यागमूर्ती, भारतीय राज्यघटनेच्या महान शिल्पकाराची महान सावली , महामानवाची प्रेरणा , करोडो वंचितांची मायमाऊली , वात्सल्याची करुणामूर्ती, महामाता-राष्ट्रमाता माता रमाई यांची १२३ वी महान जयंती ७ फेब्रुवारी रविवारी असून , त्यानिमित्ताने ह्या त्यागमूर्तीला , महामातेला अभिवादन करण्यासाठी भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख नेते भिमपँथर मा.राजेश गवळी आणि उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा भीम आर्मीच्या वतीने उल्हासनगर ते वनंद गाव (तालुका:- दापोली , जिल्हा:- रत्नागिरी) अशी भव्य बाईक रॅली अर्थात आंबेडकरी समता रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे. माता रमाईंच्या महान त्यागाचे स्मरण ठेवून , ७ फेब्रुवारी हा महान दिवस सामाजिक कृतज्ञता दिन म्हणून भीम आर्मीच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.ह्या महान दिवसाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुद्धा सरकारी पातळीवर हा दिवस सामाजिक कृतज्ञता दिवस म्हणून घोषित करून साजरा करावा , असे जाहीर आवाहन भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केले आहे.
माता रमाईंच्या जयंतीदिनी ७ फेब्रुवारी २०२१ रविवारी सकाळी ठीक ७.०० वाजता उल्हासनगर ते वनंद अशी सुमारे २३२ किलोमीटर अंतराची ही रॅली उल्हासनगर कुर्ला कॅम्प येथून निघणार असून , ह्या आंबेडकरी समता रॅलीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी भिमपँथर मा.राजेश गवळी (९०८२८०७६३९) मा.कुमारभाई पंजवाणी ( ८९८३५३७३७१) तसेच मा.प्रितेश पवार (८७७९६७३३७४) ह्यांच्याशी सदरहू क्रमांकावर संपर्क साधावा ,असे आवाहन ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. सदरहू भव्य रॅलीत चहा-नाष्टा-पाणी इत्यादींची व्यवस्था केली आहे. दुपारी भोजनाची व्यवस्था केली आहे.
रिपोर्टर