मराठी भाषेचं संवर्धन होणे काळाची गरज!राष्ट्रीय मिल संघ वाचनालयाचा भाषा संवर्धन दिन सपन्न!

मुंबई दि.२८:राष्ट्रीय मिल मजदूर संघ ग्रंथालय- वाचनालयाच्या वतीने दि.१४ ते २८ जानेवारी पर्यंत मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा सजरा करण्यात आला.आज समारोप दिनी उपस्थित सर्व वक्त्यांनी मराठी भाषेचे सवर्धन होणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.समारंभाच्या अध्यक्षस्थानी खजिनदार निवृत्ती दसाई होते.कार्यक्रमात वाचकही सहभागी झाले होते.

राष्टीय मिल मजदूर संघचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन गेल्या पंचवीस वर्षांत ग्रथालय आणि वाचनालयाचे अत्याधुनिकरण केले.इ-लायब्ररीकरण करण्याच्या द्रुष्टीने प्रयत्न चालू आहेत,असे सांगून खजिनदार निवृत्ती देसाई  म्हणाले,मराठी भाषा सातासमुद्रापलीकडे गेली आहे.संत काळापासून मराठी भाषा प्रगती पथावर असून तिचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.

उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी सांगितले, ब्रिटिशांचा अंमल असल्या पासून मराठी भाषेची वाटचाल सुरू असून मराठी बोली भाषा मैलागणिक बदलत गेली असली तरी मराठी साहित्यात तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

कथा लेखक काशिनाथ माटल म्हणाले, मराठी भाषेने मराठी माणसाला घडविला मराठी लेखकांनी ही भाषा समृध्द केली आणि अटकेपार नेली.परंतु आता तिला नव्यापिढीमध्ये तिच्या विषयी आवड निर्माण करावयास हवी !सहाय्यक सचिव मोहन पोळ, वाचनालयाच्या प्रभारी ममता घाडी,प्रियंका परब,आशा आसबे श्रावणी पवार यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले.मधू घाडी,दीपक वाळवे, सुहास हरमळकर यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरले

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट